(फोटो सौजन्य - अकाउंट)
१४ एप्रिल रोजी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नंबरवर एक मेसेज आला होता, ज्यामध्ये सलमान खानला त्याच्या घरात घुसून मारले जाईल असे लिहिले होते. याशिवाय, त्याची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकीही देण्यात आली होती. या प्रकरणात, मुंबईच्या वरळी पोलिसांनी गुजरातमधील वडोदरा येथून २६ वर्षीय आरोपी मयंक पंड्याला ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान आरोपीने सलमान खानला धमकी देण्यामागील धक्कादायक कारण सांगितले आहे. इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्याने असे केल्याचे आरोपीने सांगितले आहे.
‘मी १४ वर्षांचा होतो आणि…’, ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यावर लैंगिक अत्याचार; केला धक्कादायक खुलासा!
आरोपीने पोलिसांसमोर कबुली दिली
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, मयंक पांड्याला मुंबईच्या वरळी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपीने कबूल केले की त्याला त्याचे इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढवायचे होते. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून सलमान खानला वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे प्रेरित होऊन, मयंकने स्वतःही अशीच धमकी देण्याची योजना आखली होती.
गुगलवरून मिळवला नंबर
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने गुगलवरून मुंबई वाहतूक पोलिसांचा व्हॉट्सअॅप नंबर शोधला आणि त्यावर धमकीचा संदेश पाठवला. दुसरीकडे, या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपायुक्त (झोन ३) दत्तात्रेय कांबळे यांनी सलमान खानला धमकी देणारा संदेश आरोपी मयंक पंड्याच्या वैयक्तिक फोनवरून आल्याची पुष्टी केली आहे. तो वडोदरामध्ये ज्यूसचे दुकान चालवतो. मयंकची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
झहीर आणि सागरिका झाले आई- बाबा; गोंडस बाळाचा फोटो शेअर करून दिली आनंदाची बातमी!
मुंबई पोलिसांनी काय म्हटले?
मुंबई पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, वरळी वाहतूक नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा संदेश आला होता. त्या मेसेजमध्ये लिहिले होते की अभिनेत्याला त्याच्या घरातच मारले जाईल. याशिवाय त्याची गाडी बॉम्बने उडवली जाईल. नंबर ट्रेसिंगद्वारे पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. एफआयआर दाखल केल्यानंतर, जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा कुटुंबाने दावा केला की मयंक पंड्या मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे.