(फोटो सौजन्य-Social Media)
अजय देवगणचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘सिंघम अगेन’ सध्या चर्चेत आहे. अलीकडेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, अभिनेता सलमान खान या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात ‘चुलबुल पांडे’च्या भूमिकेत ग्रँड एंट्री करणार आहे. आता काही बातम्या समोर आल्या आहेत, ज्यामध्ये ‘सिंघम अगेन’मध्ये सलमान खानच्या कॅमिओची बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सांगितले जात आहे. खरंतर, रोहित शेट्टीने ‘सिंघम अगेन’मध्ये सलमान खानला कॅमिओसाठी तयार केल्याची बातमी आली होती, तर दबंग खानने एक पैसाही न घेता या सिनेमात कॅमिओसाठी होकार दिला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर ‘सिंघम अगेन’बद्दल चाहत्यांची उत्सुकता खूप वाढली होती. मात्र, आता हे वृत्त खोटे असल्याचे समोर आले आहे.
चुलबुल पांडे नाही दिसणार ‘सिंघम अगेन’ चित्रपटात
ई-टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ‘सिंघम अगेन’ चित्रपटात अभिनेता सलमान खान कोणताही कॅमिओ करत नाहीये. मात्र, ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. कारण ‘सिंघम अगेन’मधला बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडेचा क्रॉसओवर पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. परंतु आता सलमान खान या चित्रपटाचा भाग नाही आहे. एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, ‘चुलबुल आणि सिंघमला एकत्र पाहण्याचे स्वप्न संपले.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘पण असे का?’ असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
हे देखील वाचा- ७०० चित्रपट करणाऱ्या ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीने वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार हे स्टार्स
‘सिंघम अगेन’मध्ये सलमान खानची एंट्री होणार नाही हे निश्चित झाले असून, या चित्रपटात अनेक मोठे स्टार्स दिसणार आहेत. दीपिका पदुकोणपासून ते करीना कपूर आणि टायगर श्रॉफ यांनीही रोहित शेट्टीच्या या पोलीस विश्वात प्रवेश केला आहे. तर, ‘सूर्यवंशी’ अक्षय कुमार आणि ‘सिम्बा’ रणवीर सिंग या चित्रपटात शत्रूंशी लढताना दिसणार आहेत. या चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर देखील पोलिसांच्या अवतारात दिसणार असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. ‘सिंघम अगेन’बद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा वाटत आहे.