(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सध्या मराठी बिग बॉस सीझन ६ अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे या सीझनचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेच आहे मात्र चाहत्ये आता हिंदी बिग बॉस कधी सुरू होईल याबद्दल चर्चा करत आहेत. लोकप्रिय आणि वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ पुन्हा एकदा चर्चेत आहे. शोच्या नव्या सीझनबद्दल चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, ‘बिग बॉस २०’ बद्दल एक नवीन अपडेट समोर आले आहे. चला जाणून घेऊया, सलमान खानच्या शोबद्दल हे खास अपडेट काय आहे.
सलमान खानचा शो ‘बिग बॉस’ त्याच्या २० व्या पर्वासाठी परत येणार आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. शोच्या प्रीमियरची प्रचंड उत्सुकताही आहे. असा अंदाज वर्तवला जात आहे की, हा शो त्याच्या नियोजित सप्टेंबर-ऑक्टोबरच्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी सुरू केला जाईल.
एवढंच नाही तर, बिग बॉस २० चा प्रीमियर यावर्षी जूनमध्ये होऊ शकतो अशी चर्चा होती, पण शोबद्दलच्या ताज्या अपडेट्सनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा शो यावर्षी परत येत आहे, पण तो जूनमध्ये होणार नाही.
खरं तर, शोच्या निर्मात्यांनी तो नंतर प्रसारित करण्याची योजना आखली आहे. हा शो बहुधा ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जून महिना आधीच रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी १५’ या शोसाठी बुक झाला आहे. त्यामुळे, सलमानच्या शोला थोडा उशीर होऊ शकतो.
दरम्यान, सलमान खानचा शो “बिग बॉस १९” ऑगस्ट २०२५ मध्ये सुरू झाला. त्याचा अंतिम सोहळा डिसेंबर २०२५ मध्ये पार पडला. सलमान खानच्या शोच्या १९ व्या पर्वाचा विजेता गौरव खन्ना होता, तर फरहाना भट्ट उपविजेती ठरली. गौरवला या शोसाठी ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. हे पर्व प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले आणि त्याला भरभरून प्रेम मिळाले.






