फोटो सौजन्य - Social Media
सिनेमात अनेक मराठी तसेच Bollywood मधील कलाकार झळकणार आहेत. सिनेमातला महत्वाचा खलनायक अफझल खानाची भूमिका संजय दत्तने साकारली आहे. तर fardeen Khan आणि Vidya Balan ही सिनेमात मोठ्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या सिनेमात मराठी मालिकेतील काही कलाकारमंडळीही दिसून आली आहे. सिनेमात शिवानी मुंढेकर, आकाश नलावडे आणि कपिल होनराव झळकला आहे. मुरांबा मालिकेतील अभिनेत्री शिवानी मुंढेकर, साधी माणसं मालिकेतील आकाश नलावडे आणि सुख म्हणजे नक्की काय असत मालिकेतील कपिल होनराव ‘राजा शिवाजी’ सिनेमात झळकणार आहेत.
छत्रपती गाण्यात दिसून आले ‘हे’ चेहरे!
राजा शिवाजी चित्रपटाचा Anthem ‘छत्रपती’ 13 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होता. परंतु, जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी येताच त्यांना श्रद्धांजली म्हणून तारीख पुढे ढकलण्यात आली. गाणे 15 एप्रिल या नव्या तारखेने प्रसिद्ध करण्यात आले. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि स्वतःच गायलेल्या या गाण्यात 80 गायकांनी कोरस गायले आहे. या गाण्यात शिवानी मुंढेकर, आकाश नलावडे आणि कपिल होनराव दिसून आला आहे. कपिल होनरावने आधीच जाहीर केले होते की त्याने राजा शिवाजी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेमंडळी उत्सुक आहेत.






