(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारतीय चित्रपटसृष्टीतील अध्यात्मिक कथनाला एक नवे रूप देणारा चित्रपट म्हणजे ‘संत तुकाराम’. कर्जन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओज यांच्या सहनिर्मितीत, आदित्य ओम यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १७ व्या शतकातील महान मराठी संत कवी संत तुकाराम यांच्या जीवनावर, विचारसरणीवर आणि त्यांच्या भक्ति चळवळीवर आधारित आहे. हा चित्रपट आता लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांसाठी दाखल होणार आहे.
या चित्रपटात इतिहासाची प्रामाणिक मांडणी, उत्कृष्ट सिनेमा-कलेचे दर्शन आणि प्रभावी थिएटरिक अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. संत तुकाराम यांच्या भूमिकेत मराठी आणि हिंदी सिनेमा क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेते सुभोध भावे झळकणार आहेत. त्यांच्या प्रभावी अभिनयशैलीमुळे ते तुकारामांच्या दुःख, संघर्ष आणि दिव्य जाणीवेचे प्रभावी चित्रण मोठ्या पडद्यावर सादर करणार आहे. ‘संत तुकाराम’ हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अशा व्यक्तिमत्वाची कथा सांगतो ज्याची शांतता खूप प्रभावी होती आणि त्यांची कविता सत्याचा आवाज.
कॅन्सरमुळे अभिनेत्री Rozlyn Khan ने केला स्वतःच्या नावात बदल? हॉस्पिटलचा बँड दाखवून सांगितले कारण
या चित्रपटाची कथा १७ व्या शतकातील महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर घडते, जिथे तुकाराम वैयक्तिक दुःखातून बाहेर येऊन समाजातील शोषित, वंचित लोकांचा आवाज बनतात आपल्या भक्तीमय अभंगांद्वारे. हे सगळं या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. तसेच सुप्रसिद्ध अभिनेते सुभोध भावे मुख्य भूमिका साकारणार असून, या चित्रपटाचे सुंदर पोस्टर अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
चित्रपटात शिव सूर्यवंशी, शीना चोहान, संजय मिश्रा, अरुण गोविल, शिशिर शर्मा, हेमंत पांडे, गणेश यादव, ललित तिवारी, मुकेश भट्ट, गौरी शंकर, ट्विंकल कपूर, रूपाली जाधव आणि डीजे अकबर सामी हे कलाकार दमदार भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर दिग्गज अभिनेते मुकेश खन्ना या चित्रपटाचे सूत्रधार म्हणून दिसणार आहेत. त्यांच्या प्रभावी आवाजातून चित्रपटाला एक आध्यात्मिक दृष्टी आणि संदर्भ मिळणार आहे.
चित्रपटाचे संगीत निखिल कामत, रवि त्रिपाठी आणि वीरल-लावण यांनी दिले आहे. अभंग परंपरेसोबत शास्त्रीय आणि लोकसंगीताचा सुंदर संगम यामध्ये ऐकायला मिळणार आहे. प्रत्येक गीत तुकारामांच्या भक्ती, दुःख आणि संघर्षाला प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहे. बी. गौतम यांच्या कर्जन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओज् निर्मित ही भव्य कलाकृती भारतातील सर्व भाषांतील, प्रांतातील आणि धर्मातील प्रेक्षकांना भावेल अशी आशा आहे.