(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
IIFA 2024 लवकरच पार पडणार असून हा दिवस खूपच खास ठरणार आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट प्रतिभेचा सन्मान करण्यासाठी ओळखले जाणारे IIFA यंदा २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यास आयलंड अबुधाबी येथे होणाऱ्या या भव्य कार्यक्रमात हे सेलिब्रिटी त्यांचा परफॉर्मन्स करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
शाहिद कपूर : ‘अखियां गुलाब’ आणि ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ सारखे नवीन सुपरहिट गाण्यांनी प्रेक्षकांना मोहित करून आता हा अभिनेता पुन्हा एकदा आयफामध्ये परफॉर्म करण्यासाठी सांगितले असता तो म्हणाला, “प्रत्येक वेळी मी त्या प्रतिष्ठित जागतिक मंचावर पाऊल ठेवतो तेव्हा जादू निर्माण करतोय” असे त्याने सांगितले.
राशी खन्ना : या वर्षी अभिनेत्रीने ‘अरनमानाई 4’ मधील ‘अचाचो’ बरोबर इंटरनेट वर खळबळ माजली असताना तमिळ चित्रपट उद्योगातील वर्षातील पहिले हिट गाणे म्हणून उदयास आले. आणि आता राशी खन्नाने संपूर्ण भारतातील युवा स्टार म्हणून भूमिका प्रस्थापित केली. आता, अष्टपैलू अभिनेत्री तिच्या अभिनयाने मंचावर आग लावण्याच्या तयारीत आहे, ज्याबद्दल ती उत्साहित आहे. अभिनेत्री तिच्या दमदार डान्स मूव्ह्सने प्रेक्षकांना घायाळ करणार आहे.
विकी कौशल : अभिनेत्याची नृत्य क्षमता समोर आणणाऱ्या ‘तौबा तौबा’ या व्हायरल गाण्याच्या समावेशासह, विक्कीच्या हिट गाण्यांवर चाहत्यांनी एक आकर्षक कामगिरीची अपेक्षा केली आहे. विकी हा पुरस्कार सोहळा को-होस्ट करताना दिसणार आहे.
कृती : कृतीने ‘द क्रू’ आणि ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ सोबत चांगले वर्ष घालवले आहे. ही अभिनेत्री आयफामध्ये परफॉर्म करणार आहे. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “आयफा नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहे आणि दरवर्षी घरी परतल्यासारखे वाटते.” असे तिने सांगितले. तसेच कृतीदेखील चाहत्यांना घालाय करण्यासाठी सज्ज झाली आहे.
अनन्या पांडे : नुकतेच तिच्या वेब सीरिजमध्ये पदार्पण केल्यामुळे, अनन्या तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. अभिनेत्रीने जागतिक प्रेक्षकांसाठी काहीतरी खास आणि संस्मरणीय परफॉर्म करत असल्याचे सांगितले आहे.
जान्हवी कपूर: ‘देवरा’ स्टार प्रतिष्ठित जान्हवी देखील आयफाच्या मंचावर धडाकेबाज कामगिरीसह पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तिची उत्कंठा व्यक्त करताना जान्हवीने नमूद केले की, “जगातील भारतीय चित्रपटसृष्टीच्या सर्वात मोठ्या सोहळ्यात” परफॉर्म करताना तिला खूप आनंद झाला आहे.
हे देखील वाचा- ‘लापता लेडीज’ पोहचली ऑस्कर 2025 मध्ये, चित्रपट निर्माता किरण रावचे स्वप्न झाले पूर्ण!
बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार या IIFA 2024 अवॉर्डमध्ये सहभागी होणार आहेत. अनेक कलाकार या कार्यक्रमात कल्ला घालताना दिसत आहेत. तसेच अनेक सेलिब्रिटी परफॉर्म करताना आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत.