मनोज बाजपेयी आणि शर्मिला टागोर यांच्या गुलमोहर या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. गुलमोहरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा किताब मिळाला आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाची आघाडीची अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा आनंद गगनात मागवत नाही आहे. आपल्या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला असून चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल व्ही. चित्तेला यांचे त्यांनी कौतुक केले आहे.
गुलमोहर या चित्रपटाला पुरस्कार मिळाला ही बातमी एकूण त्या भावुक होऊन म्हणाल्या की, “ही बातमी ऐकल्यानंतर माझ्या आनंदाला सीमा उरला नाही. मी खूप आनंदी आहे. राहुल हा अतिशय अप्रतिम दिग्दर्शक आहे, हा त्याचा पहिला चित्रपट आहे आणि मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे आणि माझ्यासाठीही खूप आनंदी आहे. ही माझ्यासाठी आजची सर्वात चांगली बातमी आहे. मी अजूनही चित्रपटाच्या टीमच्या संपर्कात आहे. आम्ही चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत केले आणि शूटिंगदरम्यान सर्वांनी एकमेकांची खूप काळजी घेतली होती.” असं त्या म्हणाल्या.
काय आहे गुलमोहरची कथा?
गुलमोहरच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर, यात बत्रा कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे जी बहु-पिढ्यांचे संयुक्त कुटुंब आहे. या कुटुंबाचे गुलमोहर नावाचे ३४ वर्षे जुने घर पाडून एक उंच इमारत बांधली जाते. अशा परिस्थितीत बत्रा कुटुंब घर सोडण्याच्या तयारीत आहे. या सगळ्या गंमती जंमती या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे.
चित्रपटाची स्टार कास्ट
डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २०२३ साली प्रदर्शित झालेला ‘गुलमोहर’ हा चित्रपट राहुल व्ही चितैला यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयी आणि शर्मिला टागोर मुख्य भूमिकेत झळकले आहेत. याशिवाय अमोल पालेकर, सूरज शर्मा, कावेरी सेठ आणि उत्सवी झा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यामध्ये दिसल्या आहेत.
हे देखील वाचा- राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये वाळवी चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, आणखी तीन डॉक्युमेंटरीना मिळाला पुरस्कार!
44 श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले
याचदरम्यान, यावेळी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये एकूण ४४ श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले आहेत. यामध्ये 27 फीचर फिल्म्स, 15 नॉन फीचर फिल्म्स आणि 2 सिनेमा श्रेणीतील सर्वोत्कृष्ट लेखनाचा समावेश आहे.