माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली. सर्वोत्कृष्ट चित्रपटापासून सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्रीपर्यंत अनेक श्रेणींमध्ये हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा पुरस्कार कोणाला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली असून, ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून वाळवी या चित्रपटाने आपले स्थान प्राप्त केले आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते घोषित करण्यात आले आहे. दरवर्षी सर्व वेगवेगळ्या भाषेमधील चित्रपटांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. तसेच या वर्षी देखील हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. हे सगळे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात. गेल्यावर्षी मराठी सिनेमा ‘एकदा काय झाले’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. परंतु आता या वर्षी सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून ‘वाळवी’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. तसेच ‘आणखी एक मोहेनजोदारो’ या सिनेमाला वेस्ट बायोग्राफिकल हिस्ट्रोलिकल कम्पायलेशन फिल्म्स कॅटेगरीतअवॉर्ड मिळाला आहे.
हे देखील वाचा- ऋषभ शेट्टीने ७० वा राष्ट्रीय चित्रपटाच्या पुरस्कारात मारली बाजी, ‘कंतारा’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे मिळवले स्थान!
परेश मोकाशी यांनी या वाळवी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच वाळवी चित्रपटांबरोबरच आणखी दोन मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ या चित्रपट डॉक्युमेंटरीला बेस्ट फिल्म अवॉर्ड मिळाला आहे. तसेच ‘वारसा’ या माहितीपटाच्या देखील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याचदरम्यान ‘वाळवी’ या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, हा चित्रपट १३ जानेवातरी २०२३ रोजी चित्रपटगृहात दाखल झाला. हा चित्रपट झी स्टुडिओज यांच्या प्रोडक्शन बॅनरखाली मधुगंधा कुलकर्णी निर्मित भारतीय मराठी भाषेतील डार्क कॉमेडी रहस्यपट चित्रपट आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, अनिता दाते केळकर, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळाल्या आहेत.