(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही एक उद्योजिका देखील आहे, जी बॉलीवूड स्टार्समध्ये खूप लोकप्रिय आहे. बॉलीवूडची पार्टी किंवा स्टार्स दररोज रेस्टॉरंटच्या बाहेर पोज देताना दिसतात, पण आता शिल्पा शेट्टी आणि या रेस्टॉरंटशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमधून एका ग्राहकाची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. एका ग्राहकाची लाखो रुपयांची कार चोरीला गेल्याने संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये खळबळ उडाली आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले आहे. आणि पोलीस या प्रकरणावर लक्ष केंद्रित करत आहेत.
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये झाली चोरी
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटच्या पार्किंगमधून गायब झालेली कार व्यावसायिक रुहानची आहे. रुहान 27 ऑक्टोबरला शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये आला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही होते. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये रुहान आपली बीएमडब्ल्यू कार वॉलेटला देताना दिसत आहे, त्यानंतर त्याची कार बेसमेंटच्या पार्किंगमध्ये उभी आहे. यानंतर रुहान आपल्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये गेला, जिथे त्यांची पार्टी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होती. दुसरीकडे चोरट्याने हॅकिंगच्या मदतीने कार उघडली आणि कार घेऊन पळ काढला.
हे देखील वाचा – ‘द डर्टी पिक्चर २’ करणार धमाका? विद्या बालनने चित्रपटाच्या भूमिकेबाबत मांडले मत, म्हणाली ‘कोणती प्रतिमा…’
पोलिसात तक्रार नोंदवली
रुहानने शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये आपली कार चोरीची तक्रार दाखल केली आहे, त्यानंतर पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेवर रुहानच्या वकिलाचे म्हणणेही समोर आले आहे. ते म्हणाले की, ‘गुन्हेगारांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.’ असे त्याच्या वकिलाने सांगितले आहे. रुहानचे ८० लाखाचे नुकसान झाले आहे.
सोशल मीडियावर सक्रिय राहते
शिल्पा शेट्टी तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती खूप लोकप्रिय आहे. ती अनेकदा तिच्या लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओंद्वारे तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. सध्या या संपूर्ण प्रकरणावर शिल्पाच्या बाजूने कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
हे देखील वाचा – ‘अभी मैं सिंगल हू’! अर्जुन कपूरने मलायकासह ब्रेकअपबाबत सोडले मौन, अभिनेता लग्नासाठी झाला उतावळा?
शिल्पा शेट्टीची कारकीर्द
शिल्पा शेट्टीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात 1993 मध्ये शाहरुख खान आणि काजोलसोबत ‘बाजीगर’ चित्रपटातून केली होती. यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत चमकदार काम केले आहे. त्यांनी धडकन, फिर मिलेंगे असे हिट चित्रपट दिले आहेत. यानंतर आता अभिनेत्री बऱ्याच आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. ज्याची ती लवकरच घोषणा करेल.