
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री जया बच्चन नेहमीच त्याच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी आणि अभिनयासाठी ओळखल्या जातात. अभिनेत्रीने “जंजीर”, “अभिमान” आणि “गुड्डी” सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्या त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये सुंदर दिसल्या आहेत. आता ही अभिनेत्री ७७ वर्षांची झाली आहे, तिचे राखाडी केस ही तिची सिग्नेचर स्टाईल बनली आहे. तरुण दिसण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा बोटॉक्स वापरण्याची प्रथा ही इंडस्ट्रीमध्ये दीर्घकाळ चालत आलेली आहे, परंतु जया बच्चन आता याबद्दल उघडपणे आपले मत मांडताना दिसले आहेत. त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि राखाडी केसांवर अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जया बच्चन यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत वृद्धत्वाबद्दल सांगितले. ती म्हणाली, “मला माझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि राखाडी केसांचा अभिमान आहे.” बोटॉक्सबद्दल ती म्हणाली, “मी कधीही माझ्या चेहऱ्यावर बोटॉक्स शस्त्रक्रिया केलेली नाही आणि कधीही हे सगळं करणारही नाही.” असे अभिनेत्रीने म्हटले आहे.
जया बच्चन पापाराझींबद्दलच्या टिप्पणीमुळे चर्चेत
जया यांनी अलिकडेच पापाराझींबद्दलच्या तिच्या टिप्पणीमुळे चर्चेत आल्या. त्यांनी म्हटले की ते घाणेरडे पँट घालतात. अभिनेत्रीने त्यांचे शिक्षण, पार्श्वभूमी आणि ते कुठून आले आहेत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या विधानानंतर अनेक सेलिब्रिटींनी पापाराझींना पाठिंबा दर्शवला. आणि त्यांना फाटकारून लावले. आता अभिनेत्री बोटॉक्सबद्दलच्या टीकेमुळे चर्चेत आली आहे.
जया बच्चन यांचा शेवटचा चित्रपट
जया बच्चन या शेवटच्या २०२३ मध्ये आलेल्या “रॉकी और रानी की प्रेम कहानी” या चित्रपटात धनलक्ष्मी रंधावाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांनी मुख्य भूमिका साकारली होती. धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांनीही सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. करण जोहरच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच आता अभिनेत्री आता पुढच्या कोणत्या नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.