(फोटो सौजन्य- social media)
स्त्री 2 अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात राज कुमार राव, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी देखील दिसले होते. या चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेत्री घर बदलणार असल्याचे समोर आले आहे. तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिने तिची वैयक्तिक जागाही अपग्रेड केल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. अभिनेत्री आता बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारची बनणार असल्याची चर्चा होता आहे.
श्रद्धा अक्षय कुमारची शेजारी होणार का?
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ही अभिनेत्री लवकरच तिचा को-स्टार अक्षय कुमारची शेजारी होणार आहे. होय, ती लवकरच हृतिक रोशनच्या सी-फेसिंग जुहू अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहे. अक्षय कुमार ‘स्त्री 2’ चित्रपटात कॅमिओ करताना दिसला होता आणि तो त्याच इमारतीतील डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहतो. याआधी बातम्या येत होत्या की वरुण धवन पत्नी नताशा आणि मुलीसोबत या घरात शिफ्ट होईल पण नंतर काही कारणास्तव तसे झाले नाही. आता श्रद्धा या अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहणार असल्याचे समजले आहे.
हे देखील वाचा- Ganesh Chaturthi : बाप्पाच्या कानात सलमानने सांगितली खास इच्छा, ‘इको फ्रेंडली मूर्ती खरेदी करा’ अभिनेत्याचा सल्ला!
स्त्री ३ मध्ये दिसणार अक्षय कुमार
वरुण धवन देखील स्त्री 2 मध्ये कॅमिओ करताना दिसला होता. अक्षय कुमार चित्रपटात भोपाळमधील मानसिक आश्रयस्थानात दाखल असलेल्या रुग्णाच्या भूमिकेत दिसला होता, ज्याच्याकडे सरकटेला संपवण्याची चावी आहे. पोस्ट क्रेडिट्स पाहता आगामी भागात अक्षय कुमारची मोठी भूमिका असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. Stree 2 ची कमाई सतत वाढत आहे. या चित्रपटाने 12 व्या दिवशी 17 कोटींची कमाई केली आहे. त्यानुसार चित्रपटाचे कलेक्शन 443.5 कोटींच्या वर पोहोचले आहे. चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे तर हा चित्रपट 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो