(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अलीकडेच मलायका अरोराच्या वाढदिवसानंतर अर्जुन कपूरने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अर्जुन कपूर मलायका इरोराला तिचे नाव न घेता धीर धरण्यास सांगत होता. दरम्यान, अर्जुन कपूरने आणखी एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. अर्जुन कपूरने दावा केला आहे की तो आता लग्नासाठी पूर्णपणे तयार आहे. अर्जुन कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट सिंघम रिटर्न्सच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीत अर्जुन कपूर आपल्या टीमसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आला होता. या दीपोत्सवाचे आयोजन राज ठाकरे यांनी केले होते.
हे देखील वाचा – ‘द डर्टी पिक्चर २’ करणार धमाका? विद्या बालनने चित्रपटाच्या भूमिकेबाबत मांडले मत, म्हणाली ‘कोणती प्रतिमा…’
या कार्यक्रमात मुली अर्जुन कपूरच्या नावाचा जयघोष करताना दिसल्या. चाहत्यांनी विचारले मलायका कशी आहे? याला उत्तर देताना अर्जुन कपूरने त्याच्या ब्रेकअपबद्दल मोकळेपणाने सांगितले. एका व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर म्हणत आहे की, ‘मी सध्या पूर्णपणे सिंगल आहे. माझे इतके सुंदर वर्णन असे केले जात आहे जसे की मी लग्न करणार आहे असे काही नाही आहे. मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की अक्षय, टायगर आणि आम्ही सर्वांनी मिळून तुमच्यासाठी एक चित्रपट बनवला आहे. मला आशा आहे की तुम्हाला आमचा चित्रपट आवडेल.’ असे म्ह्णून चाहत्यांना त्याने त्याच्या मलायकासोबचा ब्रेकअपबाबतचा खुलासा केला आहे.
Crowd: Malaika Kashi aahe?
Arjun: I am single now 😂 #ArjunKapoor confirms his breakup with #MalaikaAroraChants #JaiMaharashtra at #Deepotsav2024 #SinghamAgain pic.twitter.com/Smcgu6Hy9I
— $@M (@SAMTHEBESTEST_) October 28, 2024
सोशल मीडियावर केले वक्तव्य
अर्जुन कपूरच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या विधानामुळे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आता एकत्र नसल्याचे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. ब्रेकअपनंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सातत्याने ब्रेकअपचे संकेत देत होते. मात्र, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघेही याबाबत उघडपणे बोलले नाहीत. अशा परिस्थितीत अर्जुन कपूरचे हे वक्तव्य लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अर्जुन कपूर सिंघम अगेनच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर थैमान घालण्याच्या तयारीत आहे.
हे देखील वाचा – Bigg Boss 18 : करणवीर मेहरा विरुद्ध व्हिव्हियन डिसेना! कोणाला करणार प्रेक्षक सपोर्ट?
सिंघम अगेनमध्ये झळकणार हे कलाकार
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी रोहित शेट्टीने सिंघम अगेनमध्ये असे ट्विस्ट ठेवले आहेत, जे प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहेत. चित्रपटातील पात्रांना रामायणातील पात्रे दाखवण्यात आली आहेत, जी ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसत होती. या ॲक्शन थ्रिलरमध्ये अजय देवगण, करीना कपूर खान, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत. अर्जुन कपूर रावणाच्या (खलनायक) भूमिकेत दिसणार आहे, तर अजय देवगण रामच्या भूमिकेत आणि करीना कपूर सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीत १ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.