फोटो सौजन्य - Jio Cinema
बिग बॉस १८ : बिग बॉसच्या घरामध्ये सध्या १५ सदस्य शिल्लक आहेत. आतापर्यत या घरामधून तीन सदस्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यामध्ये नायरा बॅनर्जी, गुणरत्ने सदावर्ते आणि हेमा यांना घराबाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये कोणता सदस्य घराबाहेर जाणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. आज नॉमिनेशनचा टास्क बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे. यामध्ये स्पर्धक एकमेकांवर निशाणा साधताना दिसणार आहेत. घरांमधील चर्चेत असलेले करणवीर मेहरा आणि व्हिव्हियन डिसेना यांना लोक बाहेर प्रचंड प्रेम देत आहेत. त्याचबरोबर त्यांनी बऱ्याचदा त्यांच्या मैत्रीचे किस्से घरामधील सदस्यांसमोर शेअर केले आहेत. कालचा भाग झाल्यावर आता एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये करणवीर मेहरा विरुद्ध व्हिव्हियन डिसेना असे पाहायला मिळत आहे. या दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाल्याचे दिसत आहे.
हेदेखील वाचा – Bigg Boss 18 : कॉफीवरून बिग बॉसच्या घरात बाचाबाची! करणवीर मेहराने अविनाशला धमकावलं
व्हिव्हियन डिसेना आणि शिल्पा शिरोडकर यांच्यामध्ये वादावादी ही पहिल्या आठवड्यापासून पाहायला मिळत आहे. आजच्या भागामध्ये पुन्हा व्हिव्हियन डिसेना आणि शिल्पा शिरोडकर यांच्यामध्ये भांडण झालेले दिसत आहे. यावेळी शिल्पा व्हिव्हियनला म्हणते की, जर मेंटॉर आहेस तर सगळ्यांसोबत समान राहा. यावर व्हिव्हियन डिसेना उत्तर देतो शिल्पाला की, मी काही मेंटॉरशिपचा ठेका नाही घेऊन ठेवला. यावर करणवीर तेथेच उभा असतो आणि तो शिल्पाला म्हणतो की, मी बोलतो व्हिव्हियनशी. यावर हात झटकून व्हिव्हियन कारणवीरला म्हणतो की, मला नाही बोलायचं तुझ्याशी. पुढे करण म्हणतो की, तुला माहिती आहे ना तू काय करत आहेस, तुझा परिवार तुला पाहत आहे. पुढे म्हणतो की, मग मला आजपासून मित्र वैगेरे म्हणू नकोस. व्हिव्हियन म्हणतो हो मला माहिती आहे माझा मुद्दा काय आहे ते, मला काही म्हणायचं नाही आहे.
Tomorrow Episode Promo: Rajat Dalal vs Avinash Mishra and Karan Veer Mehra vs Vivian Dsena 🔥 pic.twitter.com/OQ9bYdxSe0
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) October 28, 2024
प्रदर्शित झालेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये चाहत, एलिस आणि शहजादा धामी यांना विजेचा धक्का बसताना दिसत आहे. याशिवाय शिल्पा शरोडकर या खेळाडूंना विजेचा धक्काही बसतो. पण जेव्हा बिग बॉसने श्रुतिका अर्जुन आणि चाहत पांडेसह काही खेळाडूंना कबुलीजबाब म्हणून बोलावले तेव्हा अविनाशच्या तक्रारी बाहेर येऊ लागतात. अशाप्रकारचे बिग बॉसच्या घरामध्ये आशय आणण्याचे कारण आहे, पण बिग बॉस अविनाशवर काही कठोर कारवाई करणार का? याचं उत्तर चाहत्यांना येत्या एपिसोडमध्ये मिळेल. त्याचबरोबर अविनाश मिश्रा आणि रजत दलाल यांच्यामध्ये सुद्धा कडाक्याचा वाद पाहायला मिळणार आहे.