(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. काल, २२ जून रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा तिसरा दिवस होता आणि तिसऱ्या दिवशीच चित्रपटाने तिकीट खिडकीवर ५० कोटींचा आकडा ओलांडला आहे. याशिवाय धनुषचा ‘कुबेर’ हा चित्रपट देखील थिएटरमध्ये आहे. तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे पण तरीही चित्रपट ५० कोटींच्या जवळ आहे. चला जाणून घेऊया या दोन्ही चित्रपटांचे नवीन कलेक्शन काय आहे?
दोन्ही चित्रपटांची नवीनतम कमाई किती?
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २८.०० कोटी रुपये कमावले आहेत. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करून वर्चस्व मिळवले आहे. दुसरीकडे, धनुषच्या ‘कुबेर’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी १५.७५ कोटी रुपये कमावले आहेत. हा चित्रपट देखोल प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे.
आमिर खानच्या चित्रपटांचे कलेक्शन
याचदरम्यान, या दोन्ही चित्रपटांचे हे कलेक्शन प्राथमिक आणि अंदाजे आहेत आणि यामध्ये पूर्णपणे बदल होण्याची शक्यता आहे. यासोबतच, जर आपण पहिल्या दिवसाबद्दल म्हणजेच आमिर खानच्या चित्रपटाच्या सुरुवातीच्या दिवसाबद्दल बोललो तर, या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी १०.७ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने २०.२ कोटी रुपये कमावले आहे. आणि आता हे कलेक्शन ५० कोटींपर्यंत पोहचले आहे.
‘Anupamaa’च्या सेटवर भीषण आग, फिल्म सिटीमध्ये उडाली खळबळ; व्हिडिओ व्हायरल
‘कुबेर’ चित्रपटाच्या कमाईत घट
याशिवाय, धनुषच्या चित्रपटाच्या दोन दिवसांच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी १४.७५ कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी १६.५ कोटी रुपये कमावले. ‘कुबेर’ चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. चित्रपटाने आठवड्याच्या शेवटी जोरदार कलेक्शन करण्याची अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही आणि दुसऱ्या दिवसाच्या तुलनेत त्याची कमाई कमी झाली आहे. आता या दोन्ही चित्रपटांची कमाई कुठे थांबते आणि कोणता चित्रपट जास्त कलेक्शन करतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.