
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
संगीतकार पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना (२३ नोव्हेंबर २०२५) लग्न बंधनात अडकणार होते. परंतु, स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना काल रात्री आजारी पडल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान, पलाश आणि स्मृतीच्या संगीत समारंभाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये स्मृतीचे वडील त्यांच्या मुलीसाठी अनेक गाण्यांवर सादरीकरण करताना दिसले आहेत.
बॉलिवूडची पहिली लाफ्टर क्वीन’; जगाला खळखळून जिने हसवलं तिचा हृदय पिळवटून टाकणारा दुर्देवी अंत
बाप लेकीचा व्हिडीओ व्हायरल
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या संगीत समारंभात श्रीनिवास मानधना यांनी निळ्या शेरवानीत खूपच हँडसम दिसत होते. त्यांनी त्यांच्या मुलीसाठी “कुडमाई” हे गाणे सादर केले, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, स्मृतीचे वडील “ना रे ना रे” गाण्यावर नाचताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, ते स्मृतीसोबत नाचतानाही दिसत आहेत. बाप लेकीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेत आहे. श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका येण्याआधीच हा व्हिडीओ असल्याचे म्हटले आहे.
स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका
सर्वहित रुग्णालयाचे संचालक डॉ. नमन शाह यांनी स्मृती मानधनाच्या वडिलांबद्दल सांगितले की, “स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना रात्री ११:३० च्या सुमारास डाव्या बाजूला छातीत दुखू लागल्याने हृदयविकाराची लक्षणे जाणवली. त्यांना पुढील तपासणीसाठी ताबडतोब सांगलीतील सर्वहित हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांच्या हृदयातील एंजाइम किंचित वाढले आहेत, परंतु त्यांना सतत निरीक्षणाची आवश्यकता आहे. आमचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रोहन ठाणेदार यांनीही त्यांची तपासणी केली आहे. इकोकार्डियोग्राममध्ये काहीही नवीन आढळले नाही.” असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
BIGG BOSS 19: मालती चहरने तान्या मित्तलला मारली कानशिलात, नॉमिनेशन टास्क दरम्यान उडाला गोंधळ
डॉ. शाह यांनी पुढे स्पष्ट केले की, “परंतु, त्यांना सतत ईसीजी मॉनिटरिंग आणि आवश्यक असल्यास अँजिओग्राफीची आवश्यकता असू शकते. त्यांचा रक्तदाब सध्या थोडा वाढला आहे, म्हणून त्यांना सतत निरीक्षणाची आवश्यकता आहे. हे शारीरिक किंवा मानसिक ताणामुळे असू शकते, कदाचित लग्नाचा हंगाम असल्याने आणि खूप हालचाली असल्याने हे झालं आहे.” असे डॉ. शाह यांनी म्हटले आहे.