(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सोनू सूदने त्याच्या अभिनयाच्या आवडी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारणारा हा अभिनेता खऱ्या आयुष्यातही गरीब लोकांसाठी मसीहा बनून पुढे आला आहे. आज अभिनेता ३० जुलै २०२५ रोजी त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. याचनिमित्ताने सोनू सूदच्या कारकिर्दीबद्दल, दक्षिणेत त्याच्या लोकप्रियतेची गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत. आणि कोविड काळात त्याने लोकांना खूप मदत केली ही मदत कशी केली जाणून घेऊयात.
दक्षिण चित्रपटांमधील लोकप्रिय खलनायक
पंजाबचा राहणारा सोनू सूद आपल्या पालकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नागपूरमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. या काळात त्याने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. त्याने मॉडेलिंगमधूनच चित्रपटांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. १९९९ मध्ये सोनू सूदने तमिळ चित्रपटांमधून अभिनयात प्रवेश केला. २००० मध्ये त्याने ‘हँड्स अप’ हा तेलुगू चित्रपट केला, २००५ मध्ये त्याने ‘मजनू’ नावाच्या तेलुगू चित्रपटात काम केले. २००५ मध्ये तो नागार्जुनसोबत ‘सुपर’ चित्रपटात देखील दिसला. या चित्रपटात सोनू सूदने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. तो दक्षिणेत खूप लोकप्रिय झाला. नंतर त्याने अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये दमदार खलनायकाची भूमिका साकारली.
‘रांझना हुआ मैं तेरा…’ धनुष नाही तर ‘हा’ अभिनेता ठरवण्यात आला होता रांझनाचा ‘लीड कास्ट’
शहीद-ए-आझमसोबत बॉलीवूडमध्ये एक उत्तम सुरुवात
सोनू सूदने आपल्या कारकिर्दीची सुरुवात दक्षिणेकडील चित्रपटांमधून केली, परंतु ‘शहीद-ए-आझम (२००२)’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटात अभिनेत्याने महान क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारली. नंतर अभिषेक बच्चन अभिनीत ‘युवा (२००४)’ या चित्रपटातही सोनू सूदच्या कामाचे कौतुक झाले. ‘आशिक बनाया आपने (२००५)’ या रोमँटिक चित्रपटातूनही अभिनेत्याला खूप प्रसिद्धी मिळाली. ऐश्वर्या राय आणि हृतिक अभिनीत ‘जोधा अकबर’ पासून सलमान खानच्या ‘दबंग २’ या चित्रपटापर्यंत, सोनू सूदने बहुमुखी भूमिका केल्या. काही चित्रपटांमध्ये त्याने भावाची भूमिका केली तर काही चित्रपटांमध्ये तो खलनायक म्हणून प्रसिद्ध झाला.
‘फतेह’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाची जबाबदारी
२०२५ मध्ये सोनू सूदने ‘फतेह’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाची जबाबदारी साकारली. चित्रपट दिग्दर्शनाव्यतिरिक्त अभिनेत्याने त्यात मुख्य भूमिकाही साकारली होती. या चित्रपटात सोनू सूदने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अॅक्शन प्रेक्षकांना दाखविण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटातून मिळणारे उत्पन्न अभिनेता दान करणार असल्याचेही त्याने सांगितले होते.
कोविड काळात बनला ‘मसीहा’
‘फतेह’ चित्रपटातील कमाई दान करण्याची चर्चा करणारा सोनू सूद कोविड काळातही गरिबांसाठी मसीहा बनला. जेव्हा लॉकडाऊनचा काळ होता आणि शहरातील गरीब लोक कोणत्याही व्यवस्थेशिवाय त्यांच्या घरी परतत होते, तेव्हा सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला. हजारो लोक सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचले. सोनू सूदने जे काही करता येईल ते सर्व लोकांसाठी केले. आजही सोनू सूदची ही समाजसेवा सुरू आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या गरीब, असहाय्य व्यक्तीला मदतीची आवश्यकता असते तेव्हा तो नक्कीच मदत करतो.
रेव्ह पार्टीप्रकरणी रोहिणी खडसेंवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांची टीका
सोनू सूदचे वैयक्तिक जीवन
करिअर आणि सामाजिक कार्याव्यतिरिक्त, जर आपण सोनू सूदच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि प्रेम जीवनाबद्दल बोललो तर, त्याने १९९६ मध्ये त्याच्या मैत्रिणीशी लग्न केले. करिअर करण्यापूर्वी अभिनेता त्याच्या मैत्रिणीसोबत सेटल झाला होता. सोनू सूद आणि सोनाली त्यांच्या कॉलेजच्या काळात भेटले. प्रथम त्यांची मैत्री झाली, नंतर प्रेमात पडले आणि शेवटी त्यांनी लग्न केले. या जोडप्याला दोन मुले आहेत. सोनू सूदची पत्नी सोनाली प्रसिद्धीपासून दूर राहते.