(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
सूरज आर. बडजात्यांनी ‘बडा नाम करेंगे’ या सोनी लिव्हवर ७ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या डिजिटल पडद्यावरच्या आपल्या बहुप्रतिक्षित पदार्पणाच्या जाहिरातीसाठी अलीकडेच इंडियन आयडॉलच्या मंचावर हजेरी लावताना दिसले आहेत. यावेळी त्यांनी कलाकार आणि स्पर्धांसह अनेक गप्पा गोष्टी आणि चित्रपटामधील किस्से शेअर केले आहेत. राजश्री प्रोडक्शन्सच्या सर्वात हिट चित्रपटांचा सोहळा साजरा करणाऱ्या एका खास भागामध्ये त्यांनी ‘हम आपके है कौन’च्या चित्रिकरणावेळी पडद्यामागे घडलेला एक विलक्षण प्रसंग सांगितला. या प्रसंगात कसे माधुरी दिक्षितने सलमान खानच्या आता आयकॉनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘दीदी तेरा देवर दिवाना’च्या नाइटीतल्या प्रवेशाला प्रत्यक्षात उतरवले याची गोष्ट सांगून त्यांनी प्रेक्षकांना खूश केले आहे.
Pushpa 2: बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटीवर घालतोय धुमाकूळ; रिलीजच्या अवघ्या चार दिवसांतच रचला इतिहास!
स्पर्धक रितिकाने या गाण्याचे बहारदार सादरीकरण केल्यानंतर सूरज बडजात्या सगळ्यांना आठवणी सांगू लागले. ते म्हणाले की, “हे एक खूपच लांबलचक आणि तपशीलवार गाणं होतं. त्याच्या तालमी १६ दिवस चालल्या आणि चित्रिकरणाला ९ दिवस लागले. आम्हाला हे गाणं मौजमजेच्या आणि विजयसोहळ्याच्या साथीने एका उंचीवर नेऊन संपवायचं होते. या सीनसाठी सलमानने नाइटी घालावी असं मी माझ्या वडिलांना सुचवलं. सलमानने या प्रस्तावावर ताबडतोब मान डोलावली, पण माझ्या वडिलांनी ही कल्पना फेटाळली. त्यांना ते गाण्याला साजेसं वाटत नव्हतं. पण संपूर्ण टीम इतकी उत्साही होती की आम्ही यावर सेटवरच्या महिलांची मतं घ्यावीत असं ठरवलं. माधुरी दिक्षितसकट सगळ्या डान्सर्सना ही कल्पना प्रचंड विनोदी वाटली आणि हे करायलाच हवं असं त्यांनी सांगितलं. शेवटी, स्वत: माधुरीने या सीनसाठी सलमानचा मेकअप केला. त्या जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद!” सूरज बडजात्या असे म्हणाले.
‘दीदी तेरा देवर दिवाना’ हे गाणं आता बॉलिवूड क्लासिक मानलं जात आहे आणि या हलक्याफुलक्या किश्श्याने त्याची रंगत अधिकच वाढवली आहे. ‘बडा नाम करेगा’ या आपली मुळं शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या जेन झी प्रेमकथेच्या निमित्ताने बडजात्या ओटीटीच्या जगात प्रवेश करत असताना अविस्मरणीय क्षण निर्माण करण्याची त्यांची क्षमता नेहमीइतकीच भक्कम आहे. त्यांनी प्रेक्षकांना खूप चांगले आणि अनुभवी चित्रपट दिले आहेत. जे चाहत्यांच्या मनात अजूनही घर करून आहेत. त्यांचे चित्रपट अजूनही चाहत्यांच्या पसंतीस आहेत. आणि आता अश्यातच ते आता लवकरच ओटीटीवर पदार्पण करत आहेत.
गुल्लकमुळे नावाजले गेलेले दिग्दर्शक पलाश वासवानी आणि खुद्द सूरज आर. बडजात्या या मालिकेचे शो रनर आहे आणि यात हृतिक घनशानी, आयेशा कडुसकर, कंवलजीत सिंग, अल्का अमीन, राजेश जैस, चित्राली लोकेश, दीपिका अमीन, जमील खान, राजेश तेलंग, अंजना सुखानी, साधिका सयाल, ग्यानेंद्र त्रिपाठी, प्रियंवदा कांत, ओम दुबे, भावेश बाबानी आणि अशा कितीतरी कलाकारांचा समावेश आहे. ‘बडा नाम करेगा’ तुम्हाला प्रेम, हास्य आणि नॉस्टॅल्जियाचे मनाला भावणारे संयोजन पुरविण्याचे आश्वासन देणारी मालिका आहे. जी तुमचे भरभरून मनोरंजन करणार आहे. राजश्री प्रॉडक्शनची ही वेब सिरीज ७ फेब्रुवारी रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.