(फोटो सौजन्य - x अकाउंट)
जामिनावर तुरुंगातून सुटल्यानंतर दक्षिण भारतीय अभिनेता दर्शन थुगुदीपा याने शनिवारी पहिल्यांदाच त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहे. अभिनेत्याने ट्विटरवर पोस्ट करून चाहत्यांचे आभार मानले आहे. रेणुकास्वामी खून प्रकरणात दर्शन तुरुंगात अडकला होता. आणि अभिनेत्याने तुरुंगातून सुटका होताच चाहत्यांचे आभार मानून त्यांना एक संदेश दिला आहे. याचदरम्यान आता आपण जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण.
अभिनेत्याने काय म्हटले?
शनिवारी ट्विटरवर पोस्ट करत, अभिनेत्याने चाहत्यांना विनंती केली की, ‘१६ फेब्रुवारी रोजी त्याच्या वाढदिवशी त्याच्या घराबाहेर येऊ नये कारण त्याची तब्येत ठीक नाही आणि तो त्यांना भेटू शकणार नाही. व्हिडिओमध्ये अभिनेता म्हणाला, “माझ्या सर्व प्रिय चाहत्यांना त्यांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. मी नमस्कार करावा की आभार मानावे? मी काहीही म्हणावे, ते पुरेसे ठरणार नाही. तुम्ही मला इतके प्रेम दिले आहे की ते कसे परत करावे हे मला कळत नाही आहे.” अभिनेता पुढे म्हणाला की दरवर्षीप्रमाणे, त्याला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व लोकांना भेटून त्यांचे आभार मानायचे होते. दर्शन म्हणाला, “पण यावेळी फक्त माझ्या आरोग्याच्या समस्येचा प्रश्न आहे, बाकी काही नाही. मी जास्त वेळ उभे राहून सर्वांचे आभार मानू शकत नाही… जेव्हा जेव्हा मी १५-२० दिवस इंजेक्शन घेतो तेव्हा मला बरे वाटते आणि परिणाम कमी होताच वेदना सुरू होतात. मला ऑपरेशन करावे लागेल.” या अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना असेही सांगितले की तो लवकरच बरा होईल आणि त्यांना भेटणार आहे.
ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯ ಸೆಲೆಬ್ರಿಟಿಗಳಿಗೆ ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯ ಮನವಿ ಈ ವರ್ಷ ನನ್ನ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿಲ್ಲ ಕ್ಷಮೆ ಇರಲಿ
ಇಂತಿ ನಿಮ್ಮ ದಾಸ ದರ್ಶನ್ pic.twitter.com/ERczhYj6DC
— Darshan Thoogudeepa (@dasadarshan) February 8, 2025
निर्मात्यांना परत केले पैसे
त्याच्या प्रोजेक्ट्सकडे लक्ष वेधत तो म्हणाला, “माझी वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व निर्मात्यांचे मी आभार मानतो. मी त्यांच्यावर अन्याय करू नये, कारण तेही इतर प्रोजेक्ट्सची योजना आखत असतील. म्हणून मी स्वतःला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.” या अभिनेत्याने असेही सांगितले की, त्याने निर्माते सूरप्पा बाबू यांनी एका चित्रपटासाठी दिलेली रक्कम परत केली आहे. असे देखील अभिनेत्याने सांगितले आहे.
रेणुकास्वामी हत्या प्रकरणातील आरोपी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याचा चाहता असलेला ३३ वर्षीय रेणुकास्वामीने पवित्रा गौडा यांना अश्लील संदेश पाठवले होते, ज्यामुळे दर्शन संतापला आणि त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. ९ जून २०२४ रोजी सुमनहल्ली येथील एका अपार्टमेंटशेजारी असलेल्या नाल्याजवळ त्याचा मृतदेह आढळला. या सगळ्या प्रकरणेनंतर आता अभिनेत्याची सुटका झाली आहे. आणि आता तो लवकरच कामाला सुरुवात करणार आहे.