(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सध्या ‘महावतार नरसिंह’ हा ॲनिमेटेड चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात या चित्रपटाची कमाई २०० कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. हिंदू पौराणिक कथांवर आधारित या चित्रपटाने विविध धर्मांच्या प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आहे. प्रत्येक वर्गातील लोक ‘महावतार नरसिंह’ला पसंत करत आहेत. अलीकडेच दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी सांगितले की हा चित्रपट पाहिल्यानंतर मुस्लिम प्रेक्षकांनी त्यांना भेटून त्यांचा विश्वास दृढ केला आहे.
टायगर श्रॉफच्या ‘Baaghi 4’ चा टीझर प्रदर्शित, टायगर श्रॉफ दिसणार अॅक्शन मोडमध्ये
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक अश्विन कुमार यांनी सांगितले की, महावतार नरसिंह चित्रपटाचा प्रभाव केवळ हिंदू पौराणिक कथांपुरता मर्यादित नाही. ते म्हणाले, ‘मी विविध समुदायांच्या लोकांकडून ऐकले आहे, ज्यात अनेक मुस्लिम प्रेक्षकांचा समावेश आहे. ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की या चित्रपटाने त्यांचा विश्वास आणखी मजबूत केला आहे.’
‘महावतार नरसिंह’ हा धार्मिक चित्रपट नाही
‘महावतार नरसिंह’ हा चित्रपट केवळ धार्मिक प्रेक्षकांसाठी बनवला गेला नाही यावर अश्विन कुमार यांनी भर दिला. ते म्हणाले, ‘हा धार्मिक चित्रपट नाही. हा आंतरधर्मीय श्रद्धेवर आधारित चित्रपट आहे, कारण प्रेम ही एक वैश्विक भावना आहे आणि श्रद्धा देखील आहे. म्हणूनच हा चित्रपट वेगाने वाढत आहे.’ हा चित्रपट सिनेमागृहात चांगलीच कमाई करताना दिसत आहे.
‘महावतार नरसिंह’ची कथा काय आहे?
हा चित्रपट हिरण्यकश्यपूची कथा मांडणारा आहे, जो एक अत्याचारी राजा होता. तो त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्याला छळतो. अशा परिस्थितीत, भगवान विष्णू नरसिंहाचा (अर्धा मानव आणि अर्धा सिंह) अवतार घेतात आणि हिरण्यकश्यपूला मारतात आणि प्रल्हादला वाचवतात. ही कथा पाहताना नक्कीच प्रेक्षकांच्या अंगावर शहारा येत आहे.
तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलीज
जगभरात १७५ कोटींची कमाई
‘महावतार नरसिंह’ हा चित्रपट महावतार मालिकेतील पहिला चित्रपट आहे. या विश्वाच्या आगामी चित्रपटांमध्ये भगवान विष्णूचे सर्व १० अवतार दाखवले जाणार आहेत. अश्विन कुमार दिग्दर्शित ‘महावतार नरसिंह’ हा चित्रपट ४० कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला होता. या चित्रपटाने जगभरात १७५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.