
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सुपरस्टार प्रभास आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या चाहत्यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. नवीन वर्षाची सुरुवात धमालपणे करत, वांगाने त्याच्या आगामी “स्पिरिट” चित्रपटाचा एक धक्कादायक फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केला आहे, ज्यामध्ये प्रभास आणि तृप्ती डिमरी यांचा कधीही न पाहिलेला, डॅशिंग लूक पाहायला मिळाला आहे. “स्पिरिट” चे पोस्टर वांगाच्या मागील ब्लॉकबस्टर “अॅनिमल” चित्रपटाचे अनुसरण करते आहे, ज्याची घोषणा नवीन वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आली आहे.
नुकतेच प्रदर्शित झालेले पोस्टर एक गडद आणि शक्तिशाली सिनेमॅटिक अनुभव देत आहे. फोटोमध्ये, प्रभास त्याच्या जखमी पाठीला अनेक पट्ट्या लावलेला दिसत आहे. तर तृप्ती डिमरी शांतपणे हातात लायटर घेऊन त्याची सिगारेट पेटवताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तसेच दोघांना लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत.
‘Ikkis’मधील भारत-पाकिस्तान संवादावर CBFC ची कात्री, अनेक सीन कट केल्यानंतर मिळाले U/A प्रमाणपत्र
‘स्पिरिट’ मध्ये प्रभासची भूमिका
‘स्पिरिट’ चित्रपटात, प्रभास लांब केस आणि दाट दाढी आणि मिश्यांमध्ये दिसत आहे. जो त्याच्या व्यक्तिरेखेला आणखी आकर्षित करतो आहे. अभिनेता एका हातात वाइनचा ग्लास धरलेला दिसतो आहे, आणि त्याची जखमी झालेली पाठ कॅमेऱ्याकडे दाखवण्यात आली आहे. तसेच त्यांच्या तोंडात सिगारेट देखील आहे. ज्यामुळे त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल उत्सुकता आणखी वाढली आहे.
तृप्ती डिमरीची व्यक्तिरेखा
तृप्ती डिमरीने तिचा लूक साधा ठेवला आहे. राखाडी साडी परिधान केलेली तृप्ती प्रभासची सिगारेट पेटवताना शांत दिसत आहे. पोस्टर केवळ आकर्षित करण्यासाठी उत्तम नाही तर कथेच्या दृष्टीनेही उत्कृष्ट आहे. दोघेही आपापल्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तसेच चाहते या दोघांना एकत्र पाहून आनंदी झाले आहेत.
संदीप रेड्डी वांगा यांनी शेअर केले पोस्टर
पहिला लूक शेअर करताना संदीप रेड्डी वांगा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “भारतीय चित्रपट… तुमच्या अजनुबाहूंना भेटा. २०२६ च्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा #SpiritFirstLook.” चित्रपटाच्या अधिकृत हँडलवर पुढे लिहिले आहे, “तुम्हाला आधी जे होते ते आवडले. आता जे तुम्हाला माहित नव्हते ते आवडले… #SpiritFirstPoster #OneBadHabit #Prabhas,’ असे लिहून हा पोस्टर शेअर करण्यात आला आहे.
“स्पिरिट” कलाकार आणि प्रदर्शनाची तारीख
“स्पिरिट” हा चित्रपट प्रभास आणि संदीप रेड्डी वांगा यांच्या संयुक्त सहकार्याने बनवण्यात आला आहे, जो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, प्रभास त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. अहवालानुसार तो एका माजी आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे ज्याला काही कारणास्तव सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. असा अंदाज आहे की तृप्ती डिमरी या चित्रपटात डॉक्टरची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात विवेक ओबेरॉय, प्रकाश राज आणि कांचना यांच्याही भूमिका आहेत. अहवालानुसार प्रकाश राज पोलिस अधीक्षक (एसपी) ची भूमिका साकारणार आहेत. प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. परंतु ती देखील लवकरच समोर येणार आहे.