Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashish Chanchlani च्या ‘Ekaki ‘ या वेब सिरीजने SS Rajamouli झाले प्रभावित, सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

एस.एस. राजामौली यांनी ‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानींचे कौतुक केले, जाणून घ्या काय म्हणाले

  • By अमृता यादव
Updated On: Dec 13, 2025 | 01:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, त्यांनी आपल्या करिअरमध्ये एक मोठे पाऊल उचलले आहे. अनेक वर्षे पॅरोडी आणि कॉमिक व्हिडिओद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर, आता त्यांनी दिग्दर्शनाच्या दुनियेत आपल्या पहिल्या वेबसीरिज ‘एकाकी’सह पदार्पण केले आहे. हॉरर-कॉमेडी थ्रिलरवर आधारित या सीरिजचे पहिले दोन भाग प्रदर्शित झाले असून, प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हा क्षण आणखी खास ठरतो कारण देशातील दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनीही आशिष यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी Xवर आशिष यांच्या कामाची प्रशंसा केली. आशिषसाठी ही दाद त्यांच्या सर्जनशील प्रवासातील एक मोठा अभिमानाचा क्षण आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

एस.एस. राजामौली यांनी  लिहिले,“वाराणसीतील एका इव्हेंटमध्ये आशिषची भेट झाली होती आणि आता त्यांना स्वतः लिहिलेली, दिग्दर्शित आणि निर्मित केलेली सीरिज घेऊन पुढे येताना पाहून खूप आनंद होत आहे. एकाकी खूपच छान दिसत आहे… विशेषतः हॉररमधून साय-फायमध्ये जाणारा ट्विस्ट. अतिशय हुशार कल्पना. खूप खूप शुभेच्छा ”

Met Ashish during the Varanasi event and now Iam happy to see him with his own fully written, produced, and self-made series. 👏🏻👏🏻#Ekaki looks promising… Especially the genre shift from horror to sci-fi. A clever twist. All the best @ashchanchlani !! pic.twitter.com/csRTlMAtCD — rajamouli ss (@ssrajamouli) December 12, 2025


एकाकीमध्ये आशिष चंचलानी लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि मुख्य अभिनेता अशा अनेक जबाबदाऱ्या निभावताना दिसतात. यावरून त्यांच्या सर्जनशील आवडीची आणि मेहनतीची खोली स्पष्टपणे दिसून येते. या सीरिजसाठी त्यांनी आपल्या विश्वासू टीमला पुन्हा एकत्र आणले आहे: कुणाल छाबडिया को-प्रोड्यूसर म्हणून जोडले गेले आहेत, आकाश दोडेजा पॅरलल लीड भूमिकेत आहेत, तर जशन सिरवानी एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून प्रोजेक्ट सांभाळत आहेत आणि तनीष सिरवानी क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून सीरिजची संकल्पना आणि लूक तयार करत आहेत.

”माझं जीवन इतकंच”, Salman Khanने केला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा , म्हणाला, ”गेल्या 25 वर्षात मी…”

या सीरिजचे पटकथालेखन ग्रिशिम नवानी यांनी सहलेखनात केले आहे, तर लाइन प्रोड्यूसर रितेश सदवानी यांनी प्रोडक्शनमध्ये संपूर्ण सहकार्य दिले आहे. वेगळ्या धाटणीची आणि प्रेक्षकांना पूर्णपणे गुंतवून ठेवणारी कथा देण्याचे आश्वासन देणारी ही सीरिज एकाकीचा पहिला भाग 27 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला होता आणि दुसरा भाग 8 डिसेंबर 2025 रोजी रिलीज झाला. हे दोन्ही भाग ACV स्टुडिओजच्या यूट्यूब चॅनेलवर एक्सक्लुझिव्ह स्वरूपात प्रदर्शित करण्यात आले आहेत.

‘Dhurandhar’च्या ‘FA9LA’ गाण्याचा खरा अर्थ काय? Akshaye Khannaचं हिट गाणं नेमकं कोणी गायलं? जाणून घ्या खरी गोष्ट

Web Title: Ss rajamouli was impressed by ashish chanchlanis web series ekaki

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • Bollywood
  • horror story
  • Web Series

संबंधित बातम्या

Horror Story : काळ्या बाहुलीला लाथ मारणं पडलं महागात! ‘तो’ कधीच परतला नाही; अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर घडलेला थरार
1

Horror Story : काळ्या बाहुलीला लाथ मारणं पडलं महागात! ‘तो’ कधीच परतला नाही; अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर घडलेला थरार

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!
2

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!

अरे देवा! चक्क ५ वीच्या पुस्तकात छापलं ऐश्वर्या रायचं ‘निंबुडा-निंबुडा’ गाणं; शिक्षण विभागाच्या अजब कारभाराची जोरदार चर्चा
3

अरे देवा! चक्क ५ वीच्या पुस्तकात छापलं ऐश्वर्या रायचं ‘निंबुडा-निंबुडा’ गाणं; शिक्षण विभागाच्या अजब कारभाराची जोरदार चर्चा

Gaurav Patki : ‘ऑफिसवाली प्रेम कहाणी’ Premala Conditions Apply सिरीजवर काय म्हणाला दिग्दर्शक?
4

Gaurav Patki : ‘ऑफिसवाली प्रेम कहाणी’ Premala Conditions Apply सिरीजवर काय म्हणाला दिग्दर्शक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.