(फोटो सौजन्य - Instagram)
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे अभिनंदन करत आहेत. सुहानाचा जन्म २२ मे २००० रोजी झाला. आज ती तिचा २५ वा वाढदिवस साजरा करत आहे. सुहाना आता फक्त शाहरुख खानची मुलगी नाहीये तर ती एक बॉलिवूड अभिनेत्रींनपैकी एक बनली आहे. तिने झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले. याशिवाय ती अनेक जाहिरातींमध्येही दिसते. तिच्या वाढदिवसानिमित्त, सुहाना खानची एकूण संपत्ती किती आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
सुहाना खानची एकूण संपत्ती
जीक्यू इंडियाच्या अहवालानुसार, सुहाना खानची एकूण संपत्ती सुमारे १३ कोटी रुपये आहे. तिने तिच्या कमाईचा काही भाग रिअल इस्टेटमध्ये गुंतवला आहे. अलिबागमध्ये तिच्याकडे दोन आलिशान अपार्टमेंट आहेत, ज्याची ती एकटी मालक आहे. या अपार्टमेंटची किंमत अनुक्रमे १२.९१ कोटी आणि ९.५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
दीपिका कक्करवर होणार ट्यूमरची शस्त्रक्रिया, शोएब इब्राहिमने दिली हेल्थ अपडेट
उत्पन्नाचा स्रोत काय आहे?
सुहाना खान अभिनेत्री म्हणून चित्रपटांमधून कमाई करत आहे. याशिवाय, तिच्या उत्पन्नाचा स्रोत म्हणजे सोशल मीडियावर ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रमोशन. ती अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये दिसत असते. याशिवाय, रिअल इस्टेट हे अभिनेत्रीचे उत्पन्न वाढवण्याचे एक साधन आहे. अभिनेत्री चित्रपटांद्वारे अनेक व्यावसायिक माध्यमातून कमाई करत आहे.
सुहाना खानचे संपूर्ण शिक्षण
शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खानने मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. अभिनेत्रीने इंग्लंडमधील आर्डिंगली कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आहे. शिक्षणानंतर सुहानाने अभिनय आणि नाटकाचा कोर्सही केला. सुहानाने न्यू यॉर्क विद्यापीठाच्या टिश स्कूल ऑफ द आर्ट्समधून फिल्म मेकिंगचा कोर्स केला आहे. याशिवाय, तिने मुंबईतील एका थिएटरमध्ये अभिनयाचे क्लासेसही घेतले आहेत.
आई झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉलिवूडला ठोकला रामराम, सुपरस्टारने केला खुलासा
‘किंग’ मध्ये दिसणार अभिनेत्री
‘द आर्चीज’ चित्रपटानंतर, सुहाना खान तिच्या वडिलांच्या आगामी ‘किंग’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि सुहाना खान पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोण देखील आहे. ‘किंग’ पुढील वर्षी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये यांच्यासह अनेक कलाकार काम करताना दिसणार आहे.