गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कमालीची चर्चेत आहे. तिने २४ मार्च २०२५ रोजी गोंडस बाळाला जन्म दिला. आथिया आणि राहुलच्या घरी छोट्या परीचं आगमन झालं आहे. अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर ती कमालीची चर्चेत आहे. अभिनेत्री आथिया शेट्टी ही सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि सुपरस्टार सुनील शेट्टीची लेक आहे. त्याने आपल्या लेकीच्या करियरबद्दल एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे..
गहिरी गुपीते आणि गहिरा अपराधीभाव…’कानखजुरा’ ट्रेलर देतो न विसरता येणाऱ्या भूतकाळाची ग्वाही!
अलीकडेच, सुपरस्टार सुनील शेट्टीने दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने लेकीच्या करियरवर भाष्य केले आहे. अभिनेता सुनील शेट्टीच्या लेकीने २०१५ साली रिलीज झालेल्या ‘हिरो’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिने आजवरच्या सिनेकरियरमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच चित्रपट केले आहे. अवघ्या १० वर्षातच अभिनेत्रीने बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी आथियाने बॉलिवूड इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आथिया सध्या खासगी आयुष्यात एक नवी भूमिका साकारते. आथिया गेल्या काही दिवसांपूर्वीच आई झालीये. ती सध्या मातृत्वाचा आनंद घेतेय. त्या दरम्यानच तिच्या वडिलांनी तिच्या करियरवर भाष्य केलं आहे.
सलमान खानचा जीव पुन्हा धोक्यात? अज्ञात व्यक्तीकडून इमारतीत घुसखोरी
सुनील शेट्टी यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये, त्यांनी स्वत: सांगितले की, अथियाने अभिनय क्षेत्रातून माघार घेण्याचा निर्णय स्वतःहून घेतला. तिच्या शेवटच्या चित्रपटानंतर तिला अनेक प्रस्ताव आले होते, परंतु तिने कोणत्याही चित्रपटाची ऑफर स्वीकारली नाही. मुलाखतीमध्ये सुनील शेट्टी यांनी सांगितले की, “मला आथियाने सांगितले की, “बाबा, मला यापुढे चित्रपटांमध्ये काम करायचं नाही.” असं सांगून ती निघून गेली. मी तिच्या या निर्णयाचा आदर करतो. तिने इतरांचं न ऐकता स्वतःच्या मनाचं ऐकलं ही चांगली गोष्ट आहे.” अशाप्रकारे सुनील यांनी अथियाच्या निर्णयाबद्दल खुलासा केला.
Cannes 2025 मध्ये फाटलेला ड्रेस का घालून आली उर्वशी रौतेला? अभिनेत्रीने सांगितले खास कारण!
आथियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, सूरज पांचोली प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘हिरो’ चित्रपटातून आथियाने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर, मुबारकाँ, मोतीचूर चकनाचूर आणि नवाबजादे सारख्या चित्रपटामध्ये काम करत सर्वांचेच लक्ष वेधले. तिला फिल्मी करियरमध्ये फारसे यश मिळाले नाही. तिने अभिनय केलेल्या चित्रपटांमध्ये तिला अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही आथियाच्या अभिनयाचं चाहत्यांनी भरभरुन कौतुक केले.
दरम्यान, अथियाने जानेवारी २०२३ मध्ये क्रिकेटपटू के. एल. राहुलसोबत विवाह केला. मार्च २०२५ मध्ये त्या दोघांना मुलगी झाली. त्यांनी मुलीचे नाव ‘इवारा’ असं ठेवले. अथियाच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. परंतु तिच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक करुन सपोर्ट केला आहे.