(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूडमधील दमदार अॅक्शन हिरो सनी देओलचा आज ६७ वा वाढदिवस आहे. ‘गदर 2’ या सुपरहिट चित्रपटानंतर त्याच्या करिअरमध्ये मोठा बदल झाला असून, आता त्याच्या हातात अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सची रांग लागलेली आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने सनी देओलने आपल्या चाहत्यांना एक खास सरप्राइज गिफ्ट दिलं आहे. त्याने नव्या चित्रपटाची घोषणा करत, त्याचा मोशन पोस्टर आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सनी देओल याने फक्त चित्रपटाची घोषणाच केली नाही, तर त्यासोबत रिलीज डेट देखील जाहीर केली आहे. हे ऐकून त्याचे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
‘गदर 2’ च्या अभूतपूर्व यशानंतर सनी देओलचा दर्शकांमध्ये क्रेझ प्रचंड वाढला आहे. त्याच्या आगामी चित्रपटाकडूनही चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.या वर्षी दिवाळीचा सण आणि सनी देओल याचा वाढदिवस (19 ऑक्टोबर) एकाच दिवशी आल्यामुळे, त्याने आपल्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. सनी देओलने आपल्या X हँडलवरून त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
Power isnt what you show, its what you do!
Thank you everyone for your love and blessings , here’s something for you all who have been waiting 🤗🥰#Gabru IN CINEMAS 13th March 2026
A story of courage, conscience, and compassion.
From my heart… to the world! pic.twitter.com/D8qnhet7SN — Sunny Deol (@iamsunnydeol) October 19, 2025
घटस्फोटाच्या अफवांदरम्यान हंसिका मोटवानीने बदललं आडनाव, अभिनेत्रीने ‘का’ उचललं हे पाऊल?
चित्रपटाच्या घोषणेनंतर सगळेच त्याच्या रिलीजसाठी उत्सुक आहेत. जर गबरूच्या रिलीज डेटकडे पाहिलं तर सनी देओलचा हा चित्रपट १३ मार्च २०२६ रोजी संपूर्ण जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. असं समजलं जात आहे की या चित्रपटात अशी एक इमोशनल कथा मांडली जाणार आहे, जी प्रेक्षकांच्या हृदयाला सहज जिंकून घेईल.
याशिवाय, येत्या काळात सनी देओल ‘गबरू’ व्यतिरिक्त रामायणम्, बॉर्डर 2 आणि जाट 2 अशा अनेक चित्रपटांमध्ये धमाल करताना दिसणार आहे.