Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडिलांच्या आठवणीत सनी देओल भावुक, Dharmendra यांच्या निधनानंतर केली पहिली पोस्ट, ‘तो’ व्हिडिओ शेअर करत म्हणाला,…

धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले त्यांच्या आठवणी सनी देओलने त्यांच्या निधनानंतर पहिली पोस्ट केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 08, 2025 | 12:48 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

धर्मेंद्र यांनी २४ नोव्हेंबर रोजी या जगाचा निरोप घेतला आणि अनेक आठवणी मागे सोडल्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला आहे. त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे कुंटुबीय धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसाची तयारी करत होते. त्यांचा 90 वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा होणार होता. आज 8 डिसेंबरला धर्मेंद्र यांचा वाढदिवस होता.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर, सनी देओलने आज पहिल्यांदाच त्यांच्या वडिलांसाठी पोस्ट केली आहे. त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त, सनी देओलने धर्मेंद्र यांची आठवण काढतानाचा एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे आणि फक्त एका ओळीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जर आज धर्मेंद्र जिवंत असते तर ते त्यांचा ९० वा वाढदिवस त्यांच्या कुटुंबासोबत साजरा करत असते. या सोमवारी त्यांच्या कुटुंबाला किती आनंद होत असेल याची कल्पना करता येते. त्यांच्याकडे त्यांच्याबद्दलच्या असंख्य आठवणी आहेत आणि आज कुटुंब त्या उलगडण्यात आणि त्यांना पुन्हा जिवंत करण्यात व्यस्त असेल. अशा आठवणींच्या पानांमधून सनी देव यांनी त्यांच्या वडिलांचा एक गोड व्हिडिओ आणला आहे.

सनी देओल शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र यांना विचारतो, पप्पा तुम्ही एंजॉय करताय ना? यावर धर्मेंद्र मी एंजॉय करतोय बेटा खूप छान आहे व्ह्यू असं म्हणतात. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शन दिलं, ” आज माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे. ते नेहमीच माझ्याबरोबरच आहेत. नेहमू माझ्यात आहे. लव्ह यू पप्पा, मिस यू,” अशी पोस्ट करत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.


‘बाल विवाह करतोय…’ सूरजनंतर बोहल्यावर चढणार छोटा पुढारी? घनःश्यामचा हळदी Video पाहून नेटकऱ्यांची विनोदी प्रतिक्रिया

अभिनेत्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. बख्तियार इराणी, सौरभ राज जैनसह इतर कलाकारांनीही या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.देओल कुटुंबाने ८ डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांचा ९० वा वाढदिवस त्यांच्या लोणावळा फार्महाऊसवर साजरा करण्याची योजना आखली होती असे वृत्त आहे. तथापि, देओल कुटुंबाने हा प्लॅन बदलला आहे आणि या निमित्ताने ते त्यांच्या जुहू येथील घरी राहतील अशीही माहिती आहे. बॉलिवूडच्या या ‘ही-मॅन’चे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि १२ नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. त्यांच्यावर १२ दिवस घरी उपचार करण्यात आले आणि २४ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले.

BO Collection: ‘तेरे इश्क में’ चित्रपटाची ‘धुरंधर’ समोरही जबरदस्त कमाई; १०० कोटींच्या क्लबमध्ये होणार लवकरच सामील

Web Title: Sunny deol first post after dharmendras death shares an emotional video on his fathers birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 12:48 PM

Topics:  

  • Bollywood News
  • dharmendra
  • Sunny Deol

संबंधित बातम्या

Elvish Yadav ने ओरीच्या मारली कानशि‍लात, Video पाहून फॅन्स झाले हैराण, कारण जाणून घ्या
1

Elvish Yadav ने ओरीच्या मारली कानशि‍लात, Video पाहून फॅन्स झाले हैराण, कारण जाणून घ्या

”तो माणूस माझ्या…”, ६-७ वर्षांची असतानाच वडिलांच्या मित्रानेच केलेलं गैरवर्तन, ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
2

”तो माणूस माझ्या…”, ६-७ वर्षांची असतानाच वडिलांच्या मित्रानेच केलेलं गैरवर्तन, ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Border 2 नंतर लवकरच येणार Border 3? मेकर्सने दिली हिंट, जाणून घ्या सविस्तर
3

Border 2 नंतर लवकरच येणार Border 3? मेकर्सने दिली हिंट, जाणून घ्या सविस्तर

प्रजासत्ताक दिन 2026: ‘बॅटल ऑफ गलवान’पासून ‘मातृभूमी’पर्यंत, देशभक्ती जागवणारी सदाबहार गाण्यांची खास यादी
4

प्रजासत्ताक दिन 2026: ‘बॅटल ऑफ गलवान’पासून ‘मातृभूमी’पर्यंत, देशभक्ती जागवणारी सदाबहार गाण्यांची खास यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.