(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा स्पर्धक छोट्या पुढारी सध्या चर्चेत आहे. तो लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे समजले आहे. तसेच सोशल मीडियावर त्याने त्याच्या हळदीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला चाहते भरभरून कंमेंट करून प्रतिसाद देत आहेत. याचदरम्यान ‘बिग बॉस ५’ चा विजेता आणि घनःश्यामचा ‘बिग बॉस’ च्या घरात बनलेला मित्र सूरज चव्हाण देखील नुकताच लग्न बंधनात अडकला. आणि घनःश्याम देखील लग्न जातोय की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तसेच सूरज चव्हाणचा लग्नसोहळा पार पडला तेव्हा घनःश्याम दरोडे उपस्थित नव्हता, तेव्हा त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. घनःश्यामने यावरही एक व्हिडीओ शेअर केला होता.
घनःश्याम दरोडेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याला हळद लागताना दिसत आहे. हळदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत घनःश्यामने कॅप्शन मध्ये लिहिले, ‘नवरदेव झालो ना राव’ हळद लागली एकदाची..माझं पण ठरलं बरका…यायला लागतंय’ असे लिहून ही पोस्ट शेअर केली आहे. मात्र, या व्हिडिओच्या पुढे आणखी एक व्हिडिओ आहे. त्यामध्ये घनःश्याम लग्नाच्या कपड्यांच्या दुकानात दिसत आहे. आणि दुकानाचे प्रमोशन देखील केलं आहे.
घनःश्याम दरोडेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने कमेंट करत लिहिलं की, ‘किती फुटाची आहे मुलगी?’, तर दुसऱ्याने लिहिलं, ‘बाल विवाह करू नकोस रे घनश्या’, ‘बाळ लवकरच मंडपात येणार आता’ अशीही कमेंट एकाने केली आहे. त्याचबरोबर, ‘बालविवाहची केस होईल बाबा’, ‘बालविवाह करणं कायद्यानं गुन्हा आहे’ असे लिहून अनेक चाहत्यांनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, सूरज चव्हाणच्या लग्नाला उपस्थित न राहिल्याबद्दल घनश्यामने व्हिडिओ शेअर केलेला. घनःश्याम म्हणालेला की, कोणी आरोप केले तरीही ते आरोप सहजपणे फेटाळून लावतात. मग सूरज चव्हाणच्या लग्नाला का गेला नाही, याचं उत्तर आम्हाला द्या. बऱ्याच जणांनी कमेंट केल्या. मित्रांनो, मलाही त्याच्या लग्नाला जायचं होतं. पण खरंच सांगतो, माझे जे दाैरे चालू होते, माझे tv9 मराठीसोबत करार झाला आहे. शो सोडून मला कुठेही जाता येत नाही. काही शो असतील तर मला ते करतात येतात नाही तर मला ते शो करता येत नाहीत. तीन महिन्यांचं माझं टायप असल्याने मला कुठे जाता येत नाही. जर महत्वाचे घरातील काही असेल तर मला सुट्टी काढता येते.’






