Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर

Vikrant Massey Musafir Cafe: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अभिनेता विक्रांत मैसीचे दोन ‘मुसाफिर कॅफे’ आकार घेत आहेत. त्या कॉफेच्या बांधकामाची खास झलक समोर आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 20, 2026 | 08:25 AM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

 

Vikrant Massey Musafir Cafe: राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेता विक्रांत मैसी आता त्याच्या गाजलेल्या ‘मुसाफिर कॅफे’ची संकल्पना पडद्याच्या पलीकडे प्रत्यक्षात साकारताना दिसणार आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे दोन नवीन ‘मुसाफिर कॅफे’ उभारण्याचे काम सुरू असून, यापैकी एका कॅफेच्या बांधकामाची खास झलक समोर आली आहे. डोंगरांच्या कुशीत आकार घेत असलेल्या या कॅफेची पहिली झलक पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये उभारले जातायत दोन ‘मुसाफिर कॅफे’

विक्रांत मैसी यांच्या या प्रकल्पांतर्गत हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे दोन ‘मुसाफिर कॅफे’ सुरू करण्यात येणार आहेत. सध्या दोन्ही ठिकाणी बांधकाम सुरू असून, मालिकेत पाहायला मिळालेल्या कॅफेच्या रूपरेषेपासून प्रेरणा घेऊन या जागांची रचना केली जात आहे.

डोंगराळ परिसराशी सुसंगत अशी या कॅफेची रचना करण्यात येत असून, मालिकेतील ‘मुसाफिर कॅफे’ची उबदार आणि आपुलकीची भावना प्रत्यक्षात अनुभवता यावी, असा या प्रकल्पामागील प्रयत्न आहे.

कलाकारांसाठी असणार २० खोल्यांची आर्टिस्ट रेसिडेन्सी

या कॅफे प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आर्टिस्ट रेसिडेन्सी. कलाकारांसाठी तब्बल २० खोल्यांची व्यवस्था या संकुलात असणार आहे. कलाकारांना राहता यावे आणि त्यांना सर्जनशील कामासाठी जागा मिळावी, या उद्देशाने ही सुविधा उभारली जात आहे.

त्यामुळे ‘मुसाफिर कॅफे’ केवळ कॅफेपुरता मर्यादित न राहता कलाकारांसाठी एक वेगळी जागा म्हणूनही विकसित केला जात आहे.

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

‘मुसाफिर कॅफे’ची स्टोन-अँड-वुड थीम

समोर आलेल्या छायाचित्रात बांधकाम सुरू असलेल्या कॅफेची झलक पाहायला मिळते. डोंगराळ भूप्रदेशाला साजेशी स्टोन-अँड-वुड आर्किटेक्चर या कॅफेसाठी वापरण्यात येत आहे.

मालिकेत दिसलेल्या कॅफेसारखाच लुक आणि फील प्रत्यक्ष जागेत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॅफेसोबत आर्टिस्ट रेसिडेन्सीच्या खोल्यांचाही या संकुलात समावेश करण्यात येत आहे.

मालिकेत विक्रांत मैसी याने साकारला होता चंदर

‘मुसाफिर कॅफे’च्या संकल्पनेचा मालिकेच्या कथेशीही जवळचा संबंध आहे. विक्रांत मैसी यांनी या मालिकेत चंदरची भूमिका साकारली होती. चंदर आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करत डोंगरांमध्ये स्थायिक होतो आणि स्वतःच्या कॅफेभोवती आयुष्याचा नवा प्रवास सुरू करण्याचा प्रयत्न करतो.

कॅफे हा चंदरच्या प्रवासाचा आणि मालिकेच्या कथानकाचा महत्त्वाचा भाग होता. आता मालिकेतील ही काल्पनिक दुनिया प्रत्यक्ष आयुष्यातील जागेच्या रूपाने साकारताना दिसत आहे.

Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले, दारू प्यायली…’; समय रैनाचा नवाजुद्दीन सिद्दीकींबद्दल मोठा दावा

‘होममेड स्टोरीज’च्या माध्यमातून प्रकल्पाला आकार

विक्रांत मैसी यांच्या प्रोडक्शन हाऊस ‘होममेड स्टोरीज’च्या माध्यमातून हा प्रकल्प आकार घेत आहे. अभिनयासोबतच निर्मिती आणि आता अशा अनुभवाधारित जागेच्या निर्मितीकडेही त्यांचा प्रवास होताना दिसत आहे.

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या निसर्गरम्य वातावरणात आकार घेत असलेले हे दोन्ही ‘मुसाफिर कॅफे’ मालिकेतील जगाला प्रत्यक्ष जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: Vikrant massey musafir cafe construction himachal uttarakhand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News
  • Vikrant Massey

संबंधित बातम्या

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव  देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?
1

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
2

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
3

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
4

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.