(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘गदर २’ चित्रपटाने धमाल केल्यानंतर, सनी देओल आता ‘जाट’ या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. शुक्रवारी, निर्मात्यांनी एक पोस्टर रिलीज केले आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. नवीन पोस्टरमध्ये सनी देओल अॅक्शन अवतारात दिसत आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये कधी प्रदर्शित होणार याची चाहते आतुरनेते वाट पाहत आहेत. तसेच या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
‘जाट’ या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
सनी देओलचा ‘जाट’ हा अॅक्शन चित्रपट १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला त्याचा जबरदस्त टीझरही रिलीज झाला होता. शुक्रवारी सकाळी, निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक नवीन पोस्टर शेअर केले आणि लिहिले, “अॅक्शन सुपरस्टार सनी देओल मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एका निर्बंधित अॅक्शन अवतारासह परतला आहे. ‘जाट’ हा चित्रपट १० एप्रिल रोजी जगभरात हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.
Action Superstar @iamsunnydeol is coming to the big screens with UNRESTRICTED ACTION & UNFATHOMABLE AURA 💥💥#JAAT GRAND RELEASE WORLDWIDE ON APRIL 10th ❤️🔥
In Hindi, Telugu & TamilMASS FEAST GUARANTEED 👊
Directed by @megopichand
Produced by @MythriOfficial &… pic.twitter.com/HyOUSVQx9s— Mythri Movie Makers (@MythriOfficial) January 24, 2025
अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?
‘जाट’ मधील स्टार कास्ट
‘जाट’ चित्रपटाचे दिग्दर्शन गोपीचंदन यांनी केले आहे. सनी देओल व्यतिरिक्त, या चित्रपटात रणदीप हुडा, सैयामी खेर आणि रेजिना कॅसँड्रा सारखे कलाकार आहेत. चित्रपटाचे संगीत थमन एस यांनी दिले आहे, तर छायांकन ऋषी पंजाबी यांनी केले आहे. तसेच या चित्रपटामध्ये अनेक स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच सनी देओलचा ‘बॉर्डर २’ ही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्याध्ये वरून धवन, दिलजीत आणि अहान शेट्टीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
सनी देओलची कामाची ओळख
सनी देओलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा ‘गदर २’ मध्ये दिसला होता. सनीच्या आगामी कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्याकडे आमिर खान प्रॉडक्शनचा ‘लाहोर १९४७’ आणि जेपी दत्ताचा ‘बॉर्डर’चा सिक्वेल ‘बॉर्डर २’ देखील आहे. ‘गदर ३’ या अभिनेत्याला घेऊन बनवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे, परंतु निर्मात्यांनी याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.