Tabu & shahrukh (फोटो सौजन्य - Instagram)
‘क्रू’ नंतर तब्बू आगामी ‘औरों में कहाँ दम था’ या चित्रपटात परफॉर्म करताना दिसणार आहे. अजय देवगणसोबत ती या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. या चित्रपटानंतर ती ‘डून: द प्रोफेसी’ या हॉलिवूड सिरीजमध्ये दिसणार असून या सिरीजचा फर्स्ट लूकही समोर आला आहे, ज्याचे चाहत्यांनी खूप दमदार वर्णन केले आहे. आणि ही सिरीज रिलीज होण्यापूर्वीच त्याला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
तब्बूने मोठ्या पडद्यावर अनेक मोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली आहे आणि सगळ्या स्टार्ससोबत तिची जोडी लोकांना भरपूर आवडली आहे. 2002 मध्ये शाहरुख खानसोबत ‘साथिया’ या चित्रपटात ती पहिल्यांदा दिसली होती, मात्र त्यानंतर तिने कधीही त्याच्यासोबत काम केले नाही. ‘मैं हूं ना’ आणि ‘ओम शांती ओम’मध्ये ती फक्त छोट्या छोट्या भूमिकांमध्ये काम करताना दिसली होती. तिने पुढे शाहरुख खानसोबत काम का नाही केले याचा खुलासा केला आहे.
हे देखील वाचा- हिना खानने कॅन्सरच्या उपचारादरम्यान, स्वतःला सांत्वन देत रुग्णालयातील शेअर केला नवीन फोटो!
शाहरुख खानसोबत काम का नाही केले याचे तब्बूने सांगितले कारण
शाहरुख खान आणि तब्बू यांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर झाले आहेत. आता अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखसोबत काम का करता येत नाही हे सांगितले आहे. गलाटा इंडियाशी बोलताना तब्बू म्हणाली- मी निर्माता नाही, मी दिग्दर्शक नाही, मी पटकथा लेखक नाही, शाहरुख खान कोणासोबत काम करेल हे मी ठरवू शकत नाही. ठीक आहे? अजून कोणते चित्रपट बनवणार आहेत आणि पुढे मला कोणते चित्रपट ऑफर होणार आहेत. मी फक्त मला ते देऊ केलेल्यांनाच होय किंवा नाही म्हणू शकते. असे तिने या मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.
तब्बू आणि शाहरुख पुन्हा एकत्र दिसणार का?
तब्बू पुढे म्हणाली की, त्यांचे मार्ग अजून एकमेकांना भिडले नाही आहेत. शाहरुख खानसोबत काम करताना अभिनेत्री म्हणाली- मी कोणते चित्रपट नाकारले हे मला माहीत आहे आणि मला खात्री आहे की त्यानेही काही चित्रपट नाकारले आहेत. आमचे मार्ग बदलले असे काहीही झाले नाही, परंतु मला आणि शाहरुखला तुम्हाला एकत्र पाहायचे आहे या वस्तुस्थितीचा मला आदर करावा लागेल. याकडे मी दुर्लक्ष करणार नाही. असे तिने सांगितले.
तब्बूचा आगामी चित्रपट ‘औरों में कहाँ दम था’ 2 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या दोघांचेही चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत.