(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
आज सकाळी तेलुगू चित्रपटसृष्टीत एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेता राजेंद्र प्रसाद यांची मुलगी गायत्री यांनी ५ ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला आहे. गायत्रीने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर ४ ऑक्टोबरला तिला घाईघाईने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
रुग्णालयात दाखल करण्यात आले
मनी कंट्रोलमधील अहवालानुसार, राजेंद्र प्रसाद यांच्या मुलीला सुरुवातीला गॅस्ट्रिकचा त्रास झाला आणि नंतर त्यांना हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुपारी 12.40 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यातून त्यांचा मृत्यू झाला आहे. बातम्यांवरून समजले की, राजेंद्र प्रसाद एका चित्रपटाच्या सेटवर होते, जेव्हा त्यांना त्यांची मुलगी गायत्रीच्या प्रकृतीची माहिती मिळाली. त्यांची मुलगी 38 वर्षांची होती. गायत्री यांच्या पार्थिवावर आज हैदराबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गायत्री यांची मुलगी सई तेजस्विनी आहे. सईने बालकलाकार म्हणून काम केले आहे. गायत्रीच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राजेंद्र प्रसाद यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांनी यापूर्वी सांगितले होते की त्यांची मुलगी गायत्री यांनी प्रेमात लग्न केले होते त्यानंतर काही काळ तो तिच्याशी बोलला नाही. मात्र, नंतर त्यांनीही होकार दिला आणि या लग्नासाठी मान्यता दिली.
हे देखील वाचा- संस्कृती, कलात्मकता आणि सामाजिक भावनेचा पाहायला मिळणार मिलाप, नवी मुंबई येथील सर्वात मोठा शारदोत्सव!
ज्युनियर एनटीआरने शोक व्यक्त केला
देवरा अभिनेता ज्युनियर एनटीआर यांनी X वर कुटुंबाप्रती शोक व्यक्त करताना लिहिले, “राजेंद्र प्रसाद यांची मुलगी गायत्री मला खूप प्रिय होती. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मला आणखीनच दुःख झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना.’ असे लिहून अभिनेत्याने शोक व्यक्त केला आहे.