(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नवी मुंबई बंगाली असोसिएशन (NMBA) ही महाराष्ट्रातील बंगालींसाठी एक प्रमुख सामाजिक-सांस्कृतिक केंद्र आहे. असोसिएशनच्या वतीने पाच दिवसीय शारदोत्सव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या सिडको एक्झिबिशन सेंटर, हॉल नंबर 1, सेक्टर 30, वाशी, (वाशी रेल्वे स्टेशनच्या पुढे) येथे हा सोहळा होणार असून, 1,50,000 चौरस फूट क्षेत्रफळातील या सेंटरमधील कार्यक्रमाला 8 लाख हून अधिक लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
पश्चिम बंगालमधील कारागिरांनी पवित्र गंगेच्या काठावरील जैव-विघटनशील माती वापरून बनवलेली 18 फूटची देवीची मूर्ती पाहण्याजोगी असणार आहे. ही मूर्ती पाहून भक्ताचे डोळे भरून येतील असे सौंदर्य आहे. पारंपारिक पूजा विधींपासून ते देशभरातील कलावंतांच्या उत्कृष्ट निर्मितीचे सादरीकरण करत अर्पणांच्या प्रभावी सोहळ्याचा अनुभव यावेळी भक्तांना घेता येणार आहे. या कार्यक्रमात कोलकाता आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार, अन्वेषा, अनुपम रॉय, आकृती ककर आणि अभिजित भट्टाचार्य यांसारख्या कलाकारांची हजेरी लागणार आहे.
NMBA सर्व भाविकांसाठी तीन दिवसीय मोफत भोग वितरणाचे आयोजन देखील करणार आहेत. तसेच ते वंचित मुलांचा रॅम्प वॉक आणि ज्येष्ठ नागरिकांचे सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असलेला फॅशन शो यांचाही समावेश आहे. हा उत्सव भारताचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करण्याचे वचन देतो, धार्मिक श्रद्धांमधील एकता, परस्पर सौहार्द आणि राष्ट्राच्या परंपरांबद्दलचे प्रेम दर्शवितो.
सीएसआर उपक्रम:
बंगाली असोसिएशन यांनी अनेक उपक्रम पुढील पिढ्यांसाठी सुरू केले आहेत. ज्यामध्ये, “कर्करोग रुग्णांसाठी घर,” उपचारासाठी मुंबईला जाणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी मोफत निवास आणि निवासाची सुविधा देते. तसेच “ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम”, NMBA ने “भालोबासा” हा दूरदर्शी उपक्रम सुरू केले आहेत.
हे देखील वाचा- आलिया भट्टने बेंगळुरूमध्ये डीजे ॲलन वॉकरच्या कॉन्सर्टला लावली हजेरी, चाहत्यांना मिळाली खास झलक!
1981 मध्ये स्थापन झालेली, नवी मुंबई बंगाली असोसिएशन (NMBA) सामाजिक, सांस्कृतिक आणि लोककल्याणकारी उपक्रमांना चालना देण्यासाठी आघाडीवर आहे. नातेसंबंध जोपासण्यावर जोरदार भर देऊन, NMBA ने बंधुत्व, विश्वास आणि प्रगतीचे वातावरण निर्माण केले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायद्यांतर्गत 40 वर्षांहून अधिक काळ नोंदणीकृत धर्मादाय संस्था म्हणून, NMBA सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी समर्पित आहे. संस्था आपल्या वार्षिक कल्याणकारी कार्यक्रमांद्वारे तसेच इतर असंख्य सामाजिक-सांस्कृतिक घटनांमध्ये निराधार, अनाथ आणि बेघर यांच्या सामाजिक कल्याणासाठी सहकार्य करते.