(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
चंदू मोंडेटी दिग्दर्शित ‘थंडेल’ हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘थंडेल’ चित्रपटाचा ट्रेलर काल संध्याकाळी ७.४१ वाजता प्रदर्शित झाला. नागा आणि साई यांच्या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. काही तासांतच चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच चाहते या ट्रेलरला खूप प्रेम येत आहेत. या चित्रपटाची कथा आता जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. तसेच हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
नागा चैतन्य आणि साई पल्लवी स्टारर ‘थंडेल’चा ट्रेलर २८ जानेवारी रोजी विशाखापट्टणममध्ये लाँच करण्यात आला. हा चित्रपट एक देशभक्तीवर आधारित प्रेमकथा आहे, ज्यामध्ये भरपूर नाट्य आणि प्रेम पाहायला मिळणार आहे. ‘थंडेल’ हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. आणि प्रेक्षकांचं हा चित्रपट भरभरून मनोरंजन करणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये अनेक स्टारकास्ट पाहायला मिळणार आहेत. तसेच हे पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
नागा चैतन्यने एक्सवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आणि लिहिले, “प्रेम, धाडस आणि देशभक्तीची कहाणी. ७ फेब्रुवारी धुल्लकोटेयाला थंडेलोन ७ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात भेटूया.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. दोन तास बावीस मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये राजू (नागा चैतन्य) आणि बुज्जी (साई पल्लवी) यांचे जीवन दाखवले आहे. राजू हा एक मच्छीमार आहे जो साई पल्लवीवर खूप प्रेम करतो, जी त्याचा आधार आहे. समुद्रातील त्याच्या एका मोहिमेदरम्यान, राजूला पाकिस्तानी सैन्याने त्यांची सीमा ओलांडल्याबद्दल अटक होते. आणि यावर आधारित या चित्रपटाची संपूर्ण कथा दाखवण्यात आली आहे.
थंडेलच्या ट्रेलरला यूट्यूबवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाला आतापर्यंत १७ तासांत युट्यूबवर ७.१ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत आणि काळानुसार त्यात वाढ होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका चाहत्याने लिहिले, ‘ब्लॉकबस्टर’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘साई पल्लवीचा आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट’, दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘नायगा चैतन्य आणि साई पल्लवी दोघेही खूप गोंडस दिसत आहेत.’ असे लिहून चाहत्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.