(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
साऊथ स्टार दलापती विजय सध्या ‘जन नायकन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत असताना, चित्रपटाचे परदेशातील राइट्स कोट्यवधींना विकले गेले आहेत. दलापती विजयचा हा ६९ वा प्रदर्शित होणार चित्रपट आहे, हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. विजयच्या चित्रपटाचे परदेशी हक्क किती कोटींना विकले गेले आहेत हे आपण आता जाणून घेणार आहोत.
दलपती विजय यांच्या ६९ व्या चित्रपटाचे अधिकृत नाव ‘जन नायकन’ असे ठेवण्यात आले आहे आणि या घोषणेसोबत दोन लक्षवेधी पोस्टर्सही प्रदर्शित झाले आहेत, ज्यामुळे चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. एच. विनोथ दिग्दर्शित या राजकीय ॲक्शन थ्रिलरमध्ये पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्रीची भूमिका आणि अभिनय पाहण्यासाठी तिचे चाहते खूप आतुर झाले आहेत.
दलपथीच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे, ज्यामुळे विजयचे चाहते खूप उत्सुक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे परदेशातील हक्क परतफेड करण्यायोग्य ॲडव्हान्स आधारावर ७५ कोटी रुपयांना विकले गेले आहेत, ज्यामुळे कॉलिवूडच्या इतिहासात तमिळ चित्रपटांसाठी एक नवीन बेंचमार्क स्थापित झाला आहे. या बातमीने चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.
‘जन नायकन’ हा विजयचा शेवटचा चित्रपट असल्याने चाहत्यांसाठी त्याचे विशेष महत्त्व आहे. केव्हीएन प्रॉडक्शन्सच्या पाठिंब्याने बनवलेल्या या चित्रपटात दलपती विजय, बॉबी देओल, प्रकाश राज, ममिता बैजू आणि इतर कलाकार आहेत आणि चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध यांनी दिले आहे. या चित्रपटाची कथा जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे अद्यापही स्पष्ट झाले.
अलिकडेच, दलापती विजयच्या कारकिर्दीतील शेवटच्या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आणि शीर्षक प्रदर्शित झाले आहे. चित्रपटाचे शीर्षक ‘जन नायकन’ असे ठेवण्यात आले आहे. नावासोबतच विजयचा एक नवीन पोस्टरही रिलीज करण्यात आला आहे ज्यामध्ये तो चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजे २०२६ मध्ये पोंगलच्या मुहूर्तावर सिनेमागृहात दाखल होणार आहे. ‘जन नायकन’पूर्वी, दलपती ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ (GOAT) मध्ये दिसला होता. विजयच्या शेवटच्या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. आणि हा चित्रपट नक्कीच धुमाकूळ घालेल याची खात्री आहे.