(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
नोएडा रेव्ह पार्टी प्रकरणातील साक्षीदाराला धमकावल्याबद्दल युट्यूबर एल्विश यादवविरुद्ध अलीकडेच एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. २४ जानेवारी रोजी अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश प्रतिभा यांनी एफआयआर नोंदवण्याच्या आदेशानंतर हा खटला दाखल करण्यात आला. युट्यूबर एल्विश यादव पुन्हा एकदा नोएडा रेव्ह पार्टीशी संबंधित प्रकरणात अडकला आहे.
सौरभ गुप्ता यांनी केला आरोप
या प्रकरणातील साक्षीदार आणि पीपल फॉर ॲनिमल्स (पीएफए) शी संबंधित सौरभ गुप्ता यांनी आरोप केला की १० मे २०२४ रोजी एल्विश यादव आणि त्यांना पाठिंबा देणारे अनेक लोक एका कारमधून आले. हे सर्व लोक राज नगर एक्सटेंशनमधील सौरभ गुप्ता यांच्या सोसायटीत आले आणि त्यांना धमकावले. गुप्ता यांनी दावा केला की त्यांनी याबद्दल नंदग्राम पोलिसांकडे तक्रार केली होती परंतु कोणताही एफआयआर नोंदवण्यात आला नाही. यानंतर त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
आजोबा माजी मुख्यमंत्री, मावशी खासदार; तरीही वीर पहाडियाने का निवडलं नाही राजकारण? वाचा…
सौरभच्या भावाने स्वतः रेव्ह पार्टीचा मुद्दा उपस्थित केला
सौरभ गुप्ताचा भाऊ गौरवने नोव्हेंबर २०२३ मध्ये एल्विश यादवविरुद्ध रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. नोएडामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून एल्विश यादवला दोन्ही भावांविरुद्ध आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध द्वेष होता, असा आरोप सौरभने केला. आता पुन्हा हे प्रकरण सुरु झाले आहे आणि एल्विश यादव चर्चेत आला आहे.
जिवेमारण्याची धमकी मिळाली
सौरभ गुप्ता यांनी असाही आरोप केला आहे की एल्विश त्याला आणि त्याच्या भावाला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा किंवा अपघात घडवून आणून त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी असा दावा केला की, एल्विश यादव सोशल मीडियाद्वारे आम्हाला दररोज सतत धमक्या देत आहे. नंदग्राम पोलिस ठाण्याचे एसएचओ धरमपाल सिंह यांनी मंगळवारी पीटीआयला सांगून युट्यूबर एल्विश यादवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.