(फोटो सौजन्य-Social Media)
मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांचे ११ सप्टेंबर रोजी निधन झाले आहे. अनिल अरोरा यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी स्वतःचे आयुष्य संपवले असून, संपूर्ण अरोरा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसला आहे. त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला हे ऐकून धक्का बसला आहे.
अरबाज खान अरोरा कुटुंबासोबत आहे उभा
मलायकाचा माजी पती अरबाज खानही या काळात तिच्या घरी पोहोचला आहे. आणि तिच्या दुःखात सहभागी झाला आहे. अरबाज खान मलायकाच्या घराबाहेर पोलिस आणि इतरांशी बोलताना दिसला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. अनिल अरोरा यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मलायकाचा माजी पती अरबाज खान अरोरा कुटुंबासह या ठिकाणी उपस्थित आहे.
मलायका हे घडले तेव्हा होती कुठे?
एएनआय वृत्तसंस्थेचा माहितीनुसार, मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांचे बुधवारी सकाळी ९ वाजता निधन झाले. त्यांनी मुंबईतील वांद्रे येथील फ्लॅटच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मलायका त्यावेळी पुण्यात होती. घटनेची माहिती मिळताच अभिनेत्री मुंबईहून पुण्याला रवाना झाली.या घटनेनंतर पोलिसांनी लगेचच त्याच्या घराबाहेर नाकाबंदी केली आहे. याशिवाय मलायकाचा माजी पती अरबाज खानही तेथे पोहोचला आहे. तिच्या वडिलांनी अशा प्रकारे आत्महत्या केल्याने मलायकाला मोठा धक्का बसला आहे आणि ही फिल्म इंडस्ट्रीसाठी खूप धक्कादायक बातमी आहे.
मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांचे कुटुंब सीमेवर वसलेल्या फाजिल्का जिल्ह्यातील रहिवासी होते. अनिल अरोरा यांनी भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये नऊ वर्षे सेवा केली आहे. मल्याळम ख्रिश्चन धर्मातील जॉयस पॉलीकार्पशी त्यांचा विवाह झाला होता, ज्यांच्यापासून त्यांना मलायका अरोरा आणि अमृता अरोरा या दोन मुली होत्या. सध्या अरोरा कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या वर्षी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
जुलै २०२३ मध्ये मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा अभिनेत्री मलायका अरोरा आई जॉयससोबत रुग्णालयात उपस्थितीत होती. मात्र, अनिल अरोरा यांना कोणत्या कारणासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मलायका किंवा तिच्या कुटुंबाने अनिल अरोरा यांच्या प्रकृतीची कोणतीही दखल घेतली नाही.
हे देखील वाचा- मलायकाच्या आयुष्यातील अनेक रहस्यांचा होणार खुलासा, ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ शोची चर्चा
अनिल अरोराने आत्महत्या का केली?
आता मलायका अरोराचे वडील अनिल यांनी आत्महत्या का केली हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. शेवटी, त्याने अशा प्रकारे मृत्यूची निवड करण्याचे कारण काय होते? सध्या पोलीस या प्रकरणाचा पूर्ण तपास करत आहे.