फोटो सौजन्य - Colors सोशल मीडिया
बिग बॉस १८ : चर्चेत असलेला वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस 18मध्ये अनेक मनोरंजक गोष्टी पाहायला मिळत आहेत. परंतु दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पक्षपात होत असल्याचे प्रेक्षकांना देखील पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बिग बॉस शोला ट्रोल केले जात आहे. बिग बॉसचा लाडला विवियन डीसेनाला शोचे मेकर जिंकवण्याच्या इराद्यामध्ये आहेत असे स्पष्टपणे दिसून येत आहे. मागील पूर्ण पाच आठवडे या अभिनेत्याला बिग बॉसच्या मेकर्सने एकही चुक न दाखवता त्याला मजबूत स्पर्धा दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु बऱ्याचदा भागामध्ये वेगळं आणि विकेंडच्या वॉरला वेगळं त्यामुळे बऱ्याचदा प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
बिग बॉसच्या घरामध्ये काही मजबूत स्पर्धकांना त्यांची तोंड बंद करण्यात आली आणि त्यांना शोमध्ये कमजोर स्पर्धक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आणि त्यामुळेच शोला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. शोमध्ये अशा बऱ्याच गोष्टी बोलण्यात आल्या आहेत. परंतु विकेंडच्या वॉरला त्या मुद्द्यांवर न चर्चा होता फक्त चार स्पर्धकांवर फोकस केला जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांची मतं आहेत की जर तुम्हाला त्या मुद्द्यांवर बोलायचं नाही आहे मग ते मुद्दे एपिसोडमध्ये दाखवण्याचे कारण काय?
हेदेखील वाचा – Bigg Boss 18 : बिग बॉसच्या मेकर्सच्या निशाण्यावर पुन्हा करणवीर मेहरा! तर दुसरीकडे मैत्रिणीमध्ये तडा
बिग बॉसचा लाडला विवियन डीसेना, इशा सिंग अविनाश मिश्रा आणि एलिस कौशिक या स्पर्धकांच्या चुकांवर पुरेपूर पडदा टाकला जात आहे. बऱ्याचदा इशा सिंग आणि एलिस कौशिक हे घरामधील सदस्य इतर स्पर्धकांच्या बाबतीत नको ते बोलताना दिसले आहेत. परंतु तरीही त्यांच्यावर कधी सलमान खान किंवा बिग बॉसने प्रश्न उपस्थित केले नाही. परंतु करणवीर मेहरा असो किंवा रजत दलाल असो याच्या संदर्भात त्याचबरोबर रजत दलाल यांनी बोललेल्या संभाषणाच्या व्हिडिओ विवियन डीसेना आणि इशा सिंग यांना कन्फेशन रूममध्ये बोलावून दाखवण्यात आले होता. पण जेव्हा इशा सिंग आणि अविनाश मिश्रा यांच्यासमोर एलिस कौशिक हिने करणवीर मेहराला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्याचबरोबर तिने सांगितले होते की टेलिव्हिजनवर मला त्याचा खून करायचा आहे एवढेच नव्हे तर चाहत पांडे आणि अरफीन खान यांच्या नात्यावर टिपणी केली तेव्हा त्यांना कोणीच काही बोलले नाही. त्यामुळे प्रेक्षकांना पूर्णपणे दिसून येत आहे की चार स्पर्धकांसाठी बिग बॉस आणि त्याचे मेकर्स हे पक्षपात करताना दिसत आहेत.
एवढेच नव्हे तर कालच्या भागांमध्ये टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि निर्माती एकता कपूर हिने कालचा भाग हा होस्ट केला. यावेळी ती पुरेपूर विवियन डिसेनाची बाजू घेताना दिसली. त्याचबरोबर विवियन डिसेना आणि इशा सिंह कसे बरोबर आहेत हे संपूर्ण एपिसोडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सारा अरफीन खानने या संदर्भात सुद्धा तिने घरच्यांना प्रश्न केले आणि त्यांना उत्तर देखील दिली. सोशल मीडियावर शोचे चाहते आणि पाहणारे प्रेक्षक हे प्रचंड संतप्त झाले आहेत आणि त्यामुळे आता त्यांनी बिग बॉसला मोठ्या प्रमाणात टीका करायला सुरुवात केली आहे. या घटनांनंतर आता बिग बॉस कशाप्रकारे स्पर्धकांची बाजू घेईल आणि कशाप्रकारे खेळ दाखवेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
This girl is again spitting facts !!
👏👏@ColorsTV @EndemolShineIND ths is hw d show is coming across, bt do u guys even care..dont think so !!
U r just catering to laadla and his fanbase !!
🤮🤮SHAME ON COLORS TV
STOP DEMOTIVATING KARAN VEER#KaranVeerMehra#BiggBoss18#BB18 pic.twitter.com/VVLsZ0URYF— Karan (@Karan290781) November 8, 2024
#RohitShetty BLASTS #KaranveerMehra
Why is Colors team and BiggBoss blaming #Karan for everything & blindly supporting #VivianDsena and his puppets?
BIASED SHAME ON COLORS TV#BB18 #BiggBoss18 pic.twitter.com/Se2p3Lmybq— Subham_WRITES (@_subham_writes_) November 8, 2024