
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
साऊथ अभिनेत्री समांथा रूथ प्रभू आणि “द फॅमिली मॅन” फेम दिग्दर्शक राज निदिमोरू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. कारण त्यांच्या कथित लग्नाची बातमी आहे, जी इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. असे म्हटले जात आहे की हे जोडपे आज, १ डिसेंबर २०२५ रोजी एका खाजगी समारंभात लग्न करू शकत.
गेल्या काही दिवसांपासून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषतः रेडिटवर, असा दावा वेगाने पसरत आहे की हे प्रसिद्ध जोडपे कोइम्बतूरमधील ईशा योग केंद्रात अतिशय खाजगी लग्न करणार आहे. मात्र समंथा किंवा राज दोघांनीही त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे, सध्या या बातम्या केवळ अफवा मानल्या जात आहेत.
राज आणि डीके यांच्या लोकप्रिय वेब सिरीज “द फॅमिली मॅन” मध्ये काम करत असताना समांथाची पहिली भेट राज निदिमोरूशी झाली. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार, कालांतराने त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली आणि ते खूप जवळ आले. मात्र या अफवांबद्दल दोघांनीही कोणतेही विधान जारी केलेले नाही.
समांथा रूथ प्रभू सध्या तिच्या तब्येतीमुळे अभिनयापासून ब्रेक घेत आहे. दरम्यान, राज निदिमोरू नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “द फॅमिली मॅन ३” च्या यशाने खूप आनंदी आहे. मनोरंजन जगात अशीही चर्चा आहे की हे दोघे नेटफ्लिक्सच्या हॉरर-थ्रिलर मालिकेत, “रक्त युनिव्हर्स” मध्ये पुन्हा एकत्र येऊ शकतात.
निदिमोरूची एक्स पत्नी श्यामली डे हिची एक पोस्ट नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. रविवारी, श्यामली डे हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर “हताश लोक” बद्दल एक पोस्ट शेअर केली. तिने मायकेल ब्रूक्सचे एक वाक्य शेअर केले. तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते, “हताश लोक हताश गोष्टी करतात.” रेडिटवर ही पोस्ट शेअर करताना कोणीतरी लिहिले, “सॅम-राजच्या लग्नाच्या बातमीनंतर श्यामली डेची इंस्टा स्टोरी.”
BIGG BOSS 19: ‘आप लोमड़ी हो…’ मीडियाने प्रश्न विचारताच संतापला गौरव, फरहानाला चांगलेच सुनावले
समांथा प्रभू पहिल्यांदा राज निदिमोरूला भेटली जेव्हा त्यांनी त्यांचा क्रिएटिव्ह पार्टनर डीके सोबत “द फॅमिली मॅन” हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट राज अँड डीके च्या बॅनरखाली तयार करण्यात आला होता. त्यावेळी समांथाचे लग्न तेलुगू अभिनेता नागा चैतन्यशी झाले होते. तिच्या पतीशी घटस्फोट घेतल्यानंतर, अभिनेत्री चित्रपट निर्मात्याच्या प्रेमात पडली असे वृत्त आहे. या जवळीकतेमुळे राज आणि श्यामलीचे वेगळेपण झाले अशा अफवा पसरल्या आहेत.