(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन ६ च्या टीझरने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे… त्यानंतर शोचे तमाम प्रेक्षक अजून एका मोठ्या घोषणेची आतुरतेने वाट बघत होते आणि ती म्हणजे यंदाच्या बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची, तसेच या पर्वाचा होस्ट नक्की कोण असेल? असे देखील प्रश्न प्रेक्षकांना पडले. आता अखेर सलमान खानने होस्टच नाव जाहीर केले आहे. आणि चाहत्यांना खुश करून टाकले आहे.
प्रेक्षकांची एकच मनापासून इच्छा होती की या वर्षीही भाऊ म्हणजेच रितेश देशमुख यांनीच हा सीझन होस्ट करावा. आणि अखेर ही इच्छा पूर्ण झाली ती थेट बिग बॉस हिंदीच्या भव्य मंचावर हे जाहीर करण्यात आले आहे. बॉलीवूडमधील भाई जान म्हणजेच सलमान खानने या वर्षाची सर्वात मोठी घोषणा करत रितेश देशमुखचे खास स्वागत केले आणि जाहीर केले की बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार आहे. यानिमित्ताने देशभरातील प्रेक्षकांच्या आवडीचे दोन सुपरस्टार्स एकाच मंचावर, एकाच क्षणी त्यांना पाहून चाहते खुश झाले.
BIGG BOSS 19: ‘आप लोमड़ी हो…’ मीडियाने प्रश्न विचारताच संतापला गौरव, फरहानाला चांगलेच सुनावले
सलमान खानने रितेश देशमुखचे प्रेमाने आणि दबंग स्टाईलने बिग बॉस हिंदीच्या मंचावर स्वागत केले, आणि सलमान म्हणाला, ‘बिग बॉस नंतर देखील एंटरटेनमेंट सुरूच राहणार आहे कारण लवकरच बिग बॉस मराठी सुरू होणार आहे आणि तो घेऊन येणार आहे माझा लाडका भाऊ रितेश देशमुख. भाऊ तू देशाचा खूप मोठा प्रॉब्लेम solve केला आहेस बिग बॉस हिंदी संपल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी तू घेतली आहेस. यावेळेस नवीन काय असणार आहे.”
यावर रितेश म्हणाला, “पहिले तर तुम्हाला ब्लॉकब्लस्टर सिझनसाठी खूप शुभेच्छा सलमान भाई. मी रोज बघतो आहे, सगळ्यांना देखील हा सिझन खूप आवडतो आहे. यावेळेस मराठी सिझनमध्ये आपण एका दरवाज्यातून सदस्यांचे स्वागत करतोच पण आता आत गेल्यानंतर खूप दरवाजे त्यांचे स्वागत करणार आहेत. प्रत्येक दरवाज्यामागे काहीतरी लपलेलं असणार आहे. काहीवेळेस चांगल्या गोष्टी असतील, काहीवेळेस shocking गोष्टी असतील. म्हणजेच दरवाज्यामागे काही ना काही असणार आहे.”
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने रिलीजआधीच उडवले होश, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली एवढी कमाई
सलमान खानने मागील सिझनचे देखील कौतुक केले आणि येणाऱ्या सिझनसाठी शुभेच्छा दिल्या. याचसोबत रितेश देशमुख यांनी एक एलिमेनेशन देखील केले, सदस्यांसोबत संवाद देखील साधला. याचसोबत सलमान खान असे देखील म्हणाला कि, हा नवा सिझन मी नक्की बघणार. तसेच या नवीन मराठी सिझनमध्ये नक्कीच काही धमाकेदार घडणार आहे.
सोशल मीडियावर सलमान–रितेश यांच्या मंचावर एकत्र येण्याने उत्साहाचं वातावरण निर्माण केलं आहे. सगळीकडे एकच चर्चा आहे बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुख… दोन सुपरस्टार्स एकाच मंचावर, एकाच क्षणी भेटताच प्रेक्षकांचा आनंद वाढला आणि आता एकच वाक्य ऐकू येत आहे “दार उघडणार… नशिब पालटणार… भाऊ येणार!” बिग बॉस मराठीचा हा सिझन वाजणार.’ बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून तो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.






