(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस १९’ या रिॲलिटी शोच्या ग्रँड फिनालेपूर्वी, मीडिया घरात प्रवेश करणार आहे. ते सर्व मिळून स्पर्धकांना गंभीर प्रश्न विचारतील. नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये गौरव खन्ना ते फरहाना भट्टपर्यंत, सर्व सदस्यांना प्रश्न विचारले गेले आहेत. जे ऐकून ते चकीत झाले आहेत. ‘बिग बॉस १९’ च्या आगामी भागाच्या प्रोमोमध्ये बिग बॉस सर्व मीडिया व्यक्तिमत्त्वांचे घरात स्वागत करताना दिसत आहे. यानंतर, एक एक करून, सर्व स्पर्धक अमाल मलिक, तान्या मित्तल, गौरव खन्ना, फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे त्यांच्या खुर्च्यांवर बसतात. त्यानंतर, प्रश्नांचा सेक्शन सुरु होतो.
फरहाना भट्टवर पत्रकारांकडून तीव्र प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. तिला विचारण्यात आले की ती आधीच इतकी असभ्य का आहे? की बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर ती इतकी असभ्य झाली? हा प्रश्न ऐकून गौरव खन्ना टाळ्या वाजवू लागतो. फरहानाने उत्तर दिले, “ते माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे.” तसेच तान्याला विचारण्यात आले की, ‘तू सारखी रडत का असते’ यावर ती म्हणाली, “मी अशीच आहे.”
Promo: Media Press Conference Time 🔥pic.twitter.com/7WpU8AqsLb — BBTak (@BiggBoss_Tak) November 30, 2025
गौरव खन्ना हा सिंहाच्या कातडीतील कोल्हा आहे. असा प्रश्न गौरवला विचारण्यात आला असता तो ऐकून गौरव म्हणाला, “तुम्ही अपशब्द न वापरता बिग बॉसच्या घरामध्ये राहून दाखवा आणि हा शो जिंकवून दाखवा मग मी मानतो.” असे तो म्हणताना दिसला आहे.
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने रिलीजआधीच उडवले होश, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली एवढी कमाई
मीडियाने सदस्यांवर केले प्रश्नाचा मारा
“जर कोणी धमकी दिली तर अमाल त्यांचा सामना करतो.” अमालला विचारण्यात आले की तो लोकांना धमकावतो का? गायकाने उत्तर दिले, “खरा अमाल मलिक… त्यांचा सामना करतो. जर समोरच्याने सामना केला तर तो त्यांच्यावर उलट करेल.” असे अमाल बोलताना दिसला आहे.
दुसऱ्या प्रोमोमध्ये गौरव खन्ना आणि तान्या मित्तल भांडताना दिसत आहेत. तान्या म्हणते की ती स्वतःचे जेवण स्वतः बनवेल कारण तिला अशा गर्विष्ठ कॅप्टनसाठी काम करायचे नाही. ती पुढे म्हणते की ती कोणाचीही नोकर नाही. त्याच प्रोमोमध्ये फरहाना आणि मालती शाब्दिक वादविवाद करताना दिसत आहेत. आता या शोचा अंतिम टप्पा सुरु झाला आहे. आता ‘बिग बॉस’चा विजेता नक्की कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.






