Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बहुप्रतिक्षित ‘तुंबाड २’ चित्रपटात झळकणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री!

‘तुंबाड’ने २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या मनावर स्थान निर्माण केल्यानंतर आता तुंबाड २ ची घोषणा करण्यात आली, आता या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 30, 2025 | 01:58 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

Tumbbad Sequel: बॉलिवूडमधील एक उत्तम हॉरर थ्रिलर चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘तुंबाड’ने २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या मनावर स्थान निर्माण केलं. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे पुन्हा प्रदर्शन केल्यानंतरही प्रेक्षकांनी त्याला तितकंच प्रेम दिलं. या सिनेमातील हस्तर या राक्षासामुळे प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवलं. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे तुंबाडच्या सिक्वेलची म्हणजेच तुंबाड २ची घोषणा करण्यात आली आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आले आहे.
ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणि अपेक्षा दोन्ही वाढल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बहुप्रतिक्षित ‘तुंबाड २’ साठी मुख्य अभिनेता आणि निर्माता सोहम शाह यांनी एका प्रसिद्ध अभिनेत्रीशी संपर्क साधला आहे. आणि ती दुसरी-तिसरी कोणी नसून ‘क्वीन’ फेम कंगना राणौत आहे. सोहम आणि कंगनाला एकत्र हॉरर थ्रिलर चित्रपटात पाहणे हे प्रेक्षकांसाठी नक्कीच एक रोमांचक अनुभव ठरेल. कंगनाचा जबरदस्त अभिनय आणि सोहमचा गूढतेने भरलेला सिनेमा यांचा संगम मोठ्या पडद्यावर पाहणं ही एक मेजवानीच असणार आहे.मात्र, या कास्टिंगबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये सध्या फक्त चर्चांना उधाण आलं आहे.

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO

सोहम शाह ‘तुंबाड २’ मध्ये मुख्य अभिनेता असण्यासोबतच चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहे. ‘तुंबाड’च्या सिक्वेलचे चित्रिकरण २०२६ च्या सुरुवातीला सुरू होऊ शकते. ‘तुंबाड २’ हा एक मोठा बजेटचा चित्रपट असू शकतो, ज्याचा अंदाजे खर्च १५० कोटी रुपये असेल अशी माहिती मिळत आहे. ‘तुंबाड’ हा चित्रपट २०१८ मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर केवळ ७ कोटींची कमाई केली होती. मात्र, २०२४ मध्ये तो पुन्हा प्रदर्शित झाल्यावर, त्याने सुमारे ४० कोटींची कमाई करत एक मजबूत कलेक्शन मिळवले होतो. पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच हिंदी चित्रपटांमध्ये ‘तुंबाड’चा समावेश होतो.

मानहानी प्रकरणात कंगनावर न्यायालयाची कडक कारवाई, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची केली विनंती

तुंबाड ही गोष्ट आहे विनायक राव नावाच्या व्यक्तीची, जो ब्रिटिश भारतातल्या एका गावात तुंबाड राहतो. लहानपणी त्याच्या आईने त्याला हस्तर या राक्षसाची गोष्ट सांगितलेली असते.जो लोभाचे प्रतीक मानला जातो. ज्याला देवांनी शाप दिला आहे.विनायक मोठा झाल्यावर हस्तरच्या गुप्त खजिन्याचा शोध घेतो, आणि तो त्या खजिन्याच्या मोहात अडकतो. कथानकात लोभ, मानवी स्वभाव, आणि शापित देवता यांच्या भोवती गुंफलेली गूढ आणि भयानक कहाणी उलगडते.भारतीय सिनेसृष्टीत आजवर अनेक हॉरर चित्रपट आले, पण २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाड’ ने प्रेक्षकांना वेगळाच अनुभव दिला.

Web Title: This famous actress will be seen in the much awaited film tumbbad 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 01:57 PM

Topics:  

  • best horror movies
  • bollywod news
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Nayanthara First Look: हातात बंदूक आणि जबरदस्त स्वॅग! ‘TOXIC’ मध्ये नयनताराची दमदार एंट्री, फर्स्ट लूक पाहून फॅन्स थक्क
1

Nayanthara First Look: हातात बंदूक आणि जबरदस्त स्वॅग! ‘TOXIC’ मध्ये नयनताराची दमदार एंट्री, फर्स्ट लूक पाहून फॅन्स थक्क

”तुमचे आभार मी..”, Vijay Thalapathyने ३३ वर्षांनंतर केली अभिनय कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा,म्हणाला…
2

”तुमचे आभार मी..”, Vijay Thalapathyने ३३ वर्षांनंतर केली अभिनय कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा,म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.