(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सोशल मीडिया किंग, प्रसिद्ध अभिनेता आणि भाडिपाचा सर्वेसर्वा सारंग साठ्येनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सारंगने पॉलाबरोबर अखेर लग्न करून चाहत्यांना खुश करून टाकले आहे. सारंग आणि पॉला गेली १२ वर्ष लिव्ह इनमध्ये एकत्र राहत होते. दोघांनी आम्ही लग्न करणार नाही असं ठरवलं होतं पण अचानक त्यांनी लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याला चाहत्यांसह त्याचे मित्र-मैत्रिणींनी देखील अभिनंदन करत आहे. प्रत्येक फोटोवर चाहत्यांच्या कंमेंटचा वर्षाव होत आहे.
सारंग आणि पॉलाची जोडी सोशल मीडियावरही प्रसिद्ध आहे, चाहत्यांना हे दोघे प्रचंड आवडतात. तसेच या दोघांचे व्हिडीओ आणि केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. सारंग आणि पॉला यांनी २८ सप्टेंबर २०२५ रोजी कॅनडामध्ये लग्न केले आहे. सारंगने लग्नाचे काही फोटो आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यासोबत एक खास नोट देखील लिहिली आहे.
सारंगने लग्नाचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “गेलं वर्ष खूप कठीण होतं. जगभर संघर्ष सुरू होता. द्वेष इतका वाढला होता की पहिल्यांदाच आम्हाला वेगळं होण्याची भीती वाटली. पण प्रेम नेहमीच द्वेषावर विजय मिळवतं.” सारंगने पुढे लिहिलंय, “आमचं प्रेम आणि मैत्री जपण्यासाठी आम्ही काल म्हणजेच २८/०९/२०२५ रोजी तो कागद घेतला. आमचं लग्न अगदी वैयक्तिक पातळीवर पार पडलं आहे.”
सारंगने शेवटी लिहिले, “आमचं जवळचं कुटुंब आणि काही मित्र-मैत्रिणी Deep Cove मधल्या आमच्या आवडत्या झाडाखाली जमले… आणि हा क्षण आमच्या कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी परफेक्ट ठरला.” आम्ही एकमेकांना गोष्टी सांगितल्या, गाणी गायली आणि आयुष्यभर प्रियकर-प्रेयसी आणि सर्वात जवळचे मित्र राहण्याची शपथ घेतली. हीच आमची छोटीशी कहाणी! प्रेम नेहमीच जिंकणार”. असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. आणि चाहते त्याच अभिनंदन करत आहेत.
२० वर्षांच्या संसारनंतर निकोल किडमन आणि कीथ अर्बन झाले वेगळे, अनके दिवसांपासून झाला दुरावा
सारंग आणि पॉलाचे लग्नाचे फोटो खूप सुंदर दिसत आहेत. या फोटोमध्ये सारंगने ब्राउन कॉट घातला आहे. तर त्याला मॅचिंग असे पॉलाचा गाऊन आहे. हे दोघेही एका मोठ्या झाडाखाली पोझ देत फोटो काढताना दिसत आहे. दोघांचे फोटो आता चर्चेत आले आहेत. तसेच आता चाहते त्यांना कायमचे जोडीदार म्हणून पाहण्यासाठी तयार झाले आहेत.