
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कमल हासन यांनी सूर्याला मारली मिठी
सुपरस्टार सूर्याच्या ‘आगारम फाउंडेशन’चा १५ वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. या प्रसंगी कमल हासन यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कमल हासन आणि सूर्या एकमेकांना मिठी मारताना दिसले आहेत. यावेळी कमल हासन यांनी लोकांना संबोधित केले आणि शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आणि केंद्र सरकारवरही निशाणा साधताना अभिनेता दिसला आहे.
कमल हासन काय म्हणाले?
कमल हासन या कार्यक्रमदरम्यान म्हणाले की, ‘शिक्षण हे एकमेव शस्त्र आहे जे हुकूमशाही आणि सनातन विचारसरणीच्या साखळ्या तोडू शकते. २०१७ पासून NEET ने अनेक मुलांना वैद्यकीय शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. अगरम फाउंडेशनसारख्या संस्था देखील यात काहीही करू शकत नाहीत, कारण ही परीक्षा गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागे सोडते. शिक्षण हे केवळ एक शस्त्र नाही तर ते एक साधन आहे ज्याच्या मदतीने देशाला एक नवीन आकार देता येत आहे.’ असे अभिनेता बोलताना दिसला आहे.
केंद्र सरकारवर निशाणा साधला
अभिनेत्याने पुढे म्हटले की, ‘कायद्यात बदल तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता शिक्षित असेल. इतर काही गोष्टी स्वीकारल्याने विजय मिळणार नाही. बहुसंख्य तुमचा पराभव करतील, म्हणून सर्वांनी ज्ञान आणि एकतेचा मार्ग निवडला पाहिजे. तामिळनाडूमध्ये बऱ्याच काळापासून NEET परीक्षेला विरोध आहे. राज्य सरकारचे म्हणणे आहे की या परीक्षेचा फायदा शहरी आणि श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थ्यांना होतो. गावातील आणि सरकारी शाळांमधील गुणवंत विद्यार्थी मागे राहतात.
‘Coolie’च्या ट्रेलर लाँचमध्ये रजनीकांत झाले भावुक, अभिनेत्याने शेअर केला ‘तो’ किस्सा
‘अगरम फाउंडेशन’ म्हणजे काय?
अभिनेता सूर्या ‘अगरम फाउंडेशन’ चालवतो, जो वंचित मुलांना अभ्यासात मदत करतो. सूर्याने २००६ मध्ये ही फाउंडेशन स्थापन केली होती. ती तमिळनाडूच्या ग्रामीण भागात आहे, ज्याद्वारे मुलांना शिक्षण दिले जाते. या फाउंडेशनने २०१९ पर्यंत तीन हजारांहून अधिक मुलांना शिक्षण दिले आहे. ‘अगरम फाउंडेशन’ ला आता १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. याचनिमित्ताने साऊथ स्टार एकत्र येऊन आता सूर्याचं अभिनंदन करत आहेत.