(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
तमिळ चित्रपटसृष्टीतील थलैवा रजनीकांत यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ते केवळ त्यांच्या अभिनयानेच नव्हे तर त्यांच्या स्वभावानेही प्रेक्षकांची मने जिंकू शकतात. २ ऑगस्ट रोजी चेन्नईतील नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये ‘कुली’ चित्रपटाच्या ऑडिओ लाँच प्रसंगी त्यांनी त्यांच्या शब्दांनी लोकांना हसवले, मजेदार किस्से देखील सांगितले आणि भावनिकही झाले. अभिनेते रजनीकांत यांनी त्यांच्या आयुष्यातील भावनिक गोष्टी देखील शेअर केल्या.
रजनीकांतची मजेदार शैली
ट्रेलर लाँचच्या वेळी, अभिनेत्याने दिग्दर्शक लोकेश कनागराजबद्दल मजेदार टिप्पण्या केल्या, तसेच स्वतःची खिल्ली देखील उडवली. लोकेशसोबतच्या त्यांच्या पहिल्या भेटीची कहाणी सांगताना रजनीकांत म्हणाले की ‘कैथी’ चित्रपट पाहिल्यानंतर मी स्वतः त्याला भेटायला गेलो होतो, कारण इतर कोणताही अभिनेता माझ्याआधी त्याच्याकडे पोहचायला नको.’ असे अभिनेता म्हणाले.
‘Kingdom’ पाहिल्यानंतर दिग्दर्शक सुकुमारने लगेच केला विजय देवरकोंडाला फोन, अभिनेत्याचे केले कौतुक
अभिनेत्याने संपूर्ण टीमचे कौतुक केले
कार्यक्रमात त्यांनी चित्रपटाच्या तांत्रिक टीमचेही कौतुक केले. छायाचित्रकार गिरीश गंगाधरन, संपादक फिलोमिन राज आणि अॅक्शन डायरेक्टर अनबारिव यांचे कौतुक करताना रजनीकांत म्हणाले की ‘गे सगळे या चित्रपटाचा खरा आत्मा आहेत.’ कारण या सगळ्यांमुळे हा चित्रपट बनला आहे. असे अभिनेता रजनीकांत यांचे म्हणणे आहे.
The Entire Stadium is ERUPTED When Superstar #Rajinikanth Sir Mentioned #Ajithkumar Sir’s Name!! 🌋
Pure GOOSEBUMPS Moment 💯🔥#CoolieUnleashed | #AK64 pic.twitter.com/C6kFAhsYSr
— AJITHKUMAR FANS CLUB (@ThalaAjith_FC) August 2, 2025
रजनीकांत यांनी स्वतः कुली म्हणून केले काम
रजनीकांत यांनी चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखेच्या खोलीबद्दल बोलताना सांगितले की त्यांनी स्वतः एकेकाळी कुळी म्हणून काम केले होते. ते भावनिक झाले आणि त्यांनी कॉलेजमधील एका जुन्या मित्राने त्यांना ओळखले तेव्हाचा क्षण शेअर केला. तो प्रसंग त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच आला जेव्हा ते खूप रडले. हा किस्सा सांगताना अभिनेते रजनीकांत भावुक होताना दिसले.
अभिनेत्याने आमिर खानचे देखील केले कौतुक
याशिवाय, नागार्जुन, आमिर खान आणि लोकेश यांच्या दीर्घ मुलाखतींवर टिप्पणी करून ते खूप हसले. श्रुती हासनबद्दल त्यांनी असेही म्हटले की ती इतकी गंभीर भूमिका साकारणार आहे यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. पण आता त्यांनी स्वीकारले आहे की श्रुतीने चित्रपटात चांगले काम केले आहे. त्यांनी सत्यराजसोबतचे जुने वैचारिक मतभेदही खुल्या व्यासपीठावर स्वीकारले, परंतु असेही म्हटले की सत्यराजसारखे मनापासून बोलणारे लोक विश्वास ठेवू शकतात. ‘कुली’ चित्रपट १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याच वेळी, रजनीकांतचा हा चित्रपट हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांच्या ‘वॉर २’ ला टक्कर देणार आहे.