(फोटो सौजन्य-Social Media)
थिएटर कलाकार म्हणून आपल्या प्रवासाला सुरुवात करणारा अभिनेता अनुज सैनी त्याच्या आगामी ‘आयुष्मती गीता मॅट्रिक पास’ या बॉलीवुड चित्रपटातून पदार्पण करणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या थीमवर आधारित हा हृदयस्पर्शी चित्रपट, पुरुष नायक आपल्या पत्नीला शिक्षित करण्यासाठी सर्व अडचणींना तोंड देत कसा सर्व संकटाना सामोरे जातो. यावर आधारित या चित्रपटाची कथा असून, 28 सप्टेंबर रोजी डीवाय पाटील इन्स्टिट्यूट पुणे येथे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलर लाँच होताच सोशल मीडियावर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता अनुज सैनी पहिल्याच पदार्पणामुळे चाहत्यांमध्ये चमकत आहे.
तसेच, चित्रपटाच्या कलाकारांनी चित्रपटाच्या कथेबाबत आपले मत स्पष्ट केले आहे. अभिनेता अनुज सैनी या चित्रपटाबाबत म्हणाला की, “मी माझे पहिले गाणे प्रदिप खैरवार सोबत केले. तेव्हापासून मी माझे सगळे प्रिजेक्ट आणि ऑडिशनची क्लिप प्रदिप सरांना पाठवून त्यांच्याकडून फीडबॅक मागायचो. असे त्याने सांगितले. यासच या चित्रपटासाठी अभिनेत्याने बरीच मेहनत देखील घेतली आहे. तो पुढे म्हणाला, “मी यूपी बोली जाणून घेण्यासाठी बनारसमध्ये राहिलो, तेथील लोकांचे निरीक्षण केले, त्यांची फॅशन आत्मसात केली.’ असे त्याने सांगितले.
आपल्या प्रवासाविषयी बोलताना सैनी म्हणाला, “मी मुंबईत आलो तेव्हा मला काहीच माहीत नव्हती. आपण ऑडिशनला कुठे जायचे हे समजायला मला सहा महिने लागले. आत्तापर्यंत मी 3000 हून अधिक ऑडिशन्स दिल्या आहेत. काही जिंकले आणि काही अयशस्वी झाले, परंतु ही सर्व एक उत्तम शिकण्याची प्रक्रिया आहे.” असे अभिनेत्याने सांगितले.
यापूर्वी, सैनी समीक्षकांनी प्रशंसित राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘गांधी गोडसे – एक युद्ध’ मध्ये दिसला होता. त्यांनी प्रामुख्याने दिग्गज पंकज कपूर आणि रजत कपूर यांच्यासह थिएटरमध्ये काम केले आहे. सुप्रसिद्ध ब्रँड्सच्या जाहिरातींमध्येही तो दिसला आहे. ब्रँड एंडोर्समेंटमध्ये त्याने आलिया भट्ट आणि जान्हवी कपूरसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. जाहिरातींव्यतिरिक्त, अभिनेता अनेक चार्टबस्टर गाण्यांमध्ये वैशिष्ट्यीकृत आहे जसे की व्हायरल ‘वास्ते’, ‘मेरे अंगने में’, ‘मैनु दास तू’ यांसारख्या अनेक गाण्यामध्ये अभिनेत्याने काम केले आहे.
हे देखील वाचा-शाहरुख खानने IIFA अवॉर्ड्स 2024 मध्ये पहिल्यांदाच मुलगा आर्यनच्या अटकेबाबत केला खुलासा!
तसेच अभिनेता आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अनुज सैनीचा ‘आयुष्मती गीता मॅट्रिक पास’ हा चित्रपट दिग्दर्शक प्रदीप खैरवार यांनी दिग्दर्शित केला आहे. याचदरम्यान हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना या चित्रपटाचा नवा अनुभव लवकरच घेता येणार आहे.