Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनुराग कश्यपननंतर आता प्रकाश राजने साधला The Kerala Story 2 वर निशाणा; बीफ-पोर्क थाळीचा फोटो शेअर करत केली टीका

विपुल अमृतलाल शाह यांचा "द केरळ स्टोरी २" चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादात अडकला आहे. अनुराग कश्यपच्या टीकेनंतर आता अभिनेता प्रकाश राज यांनीही चित्रपटावर टीका केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 23, 2026 | 09:49 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रकाश राजने केली “द केरळ स्टोरी २” वर टीका
  • बीफ-पोर्क थाळीचा फोटो केला शेअर
  • “द केरळ स्टोरी २” कधी होणार प्रदर्शित
 

“द केरळ स्टोरी २” या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. ट्रेलरमध्ये एका मुस्लिम कुटुंबाकडून मुख्य भूमिकेतील अभिनेत्रीला जबरदस्तीने गोमांस खायला घातले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. रविवारी, अभिनेता प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटाभोवती सुरू असलेल्या वादाबद्दल ट्विट केले आहे.

अभिनेता प्रकाश राज यांनी आपल्या सोशल मीडियावर या वादाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर पोर्क, गोमांस आणि मासे यांच्या पदार्थांचे फोटो शेअर करत लिहिले, “खरी #केरळस्टोरी म्हणजे पोर्क, गोमांस आणि मासे हे शाकाहारी जेवणासोबत एकत्र नांदतात आणि आनंदाने राहतात. कृपया याचा आनंद घ्या. सर्वांना रविवारीच्या शुभेच्छा.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

“लक्ष्या मला स्ट्रेट फॉलो करायचा…” अशोक सराफांचे वक्तव्य! “मी हिरो तर तो माझा भाऊ, ड्राइव्हर…”

अनुराग कश्यप यांनीही केली चित्रपटावर टीका

यापूर्वी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी “द केरळ स्टोरी २” या चित्रपटाबद्दल तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत म्हटले होते, “केरळ स्टोरी हा एक अतिशय वाईट चित्रपट आहे. हा केवळ प्रचारासाठी बनवलेला आहे. पूर्णपणे निरर्थक आहे. असे कोण बीफ खायला घालतो? असे तर कोणी खिचडीसुद्धा खायला घालत नाही.”

केरळच्या मुख्यमंत्र्यांनीही केली टीका

काही दिवसांपूर्वी पिनारायी विजयन यांनीही चित्रपटाचा निषेध करत निवेदन जारी केले होते. त्यांनी म्हटले, “केरळला दहशतवादाचे केंद्र म्हणून दाखवण्याच्या प्रयत्नांना आपण सर्वांनी मिळून फेटाळून लावले पाहिजे. केरळ हा धार्मिक सलोख्याचा प्रदेश आहे, शाश्वत विकासात आघाडीवर आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आदर्श मानला जातो.”

 

The real #KeralaStory is how pork, beef and fish coexist with vegetarian sadya and all of them live in harmony. Please relish 😍😍😍 #justasking happy Sunday everyone ❤️❤️ pic.twitter.com/Ea2JCPd6n6 — Prakash Raj (@prakashraaj) February 22, 2026

२.७८ कोटींची खरेदी केली नवी प्रॉपर्टी; मोजक्या हिट चित्रपटांनंतरही अरबाज खानची ५०० कोटींची संपत्ती कशी?

‘द केरळ स्टोरी २’ चे दिग्दर्शक काय म्हणाले

एचटीला दिलेल्या एका निवेदनात विपुल अमृतलाल शहा यांनी सांगितले की हा चित्रपट भारतीय कायदेशीर व्यवस्थेशी संबंधित वास्तविक प्रकरणांवर आधारित आहे. ते म्हणाले, “जेव्हा आम्ही ‘द केरल स्टोरी: गोज बियॉन्ड’सारखा चित्रपट बनवला, तेव्हा तो भारतातील व्यापक परिस्थितीचे अधिक प्रभावी प्रतिनिधित्व करेल, अशी आमची इच्छा होती. म्हणूनच आम्ही ज्या तीन कथांची निवड केली, त्या केवळ त्यांच्यापुरत्याच मर्यादित ठेवू शकलो नाही. अनेक मुलींच्या आयुष्यातील विविध घटनांचा समावेश करून त्यांना या कथांचा भाग बनवले आहे. परिणामी, हा चित्रपट जरी तीन मुलींची कथा सांगत असला, तरी त्यात अनेक अनुभवांच्या आणि वास्तव घटनांची झलक पाहायला मिळणार आहे.”

‘द केरळ स्टोरी २’ ची कथा आणि प्रदर्शन तारीख

दरम्यान, ‘द केरळ स्टोरी २’ या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) कडून ‘यू/ए’ प्रमाणपत्र मिळाले आहे. हा चित्रपट जबरदस्तीने धर्मांतर रॅकेटमध्ये अडकलेल्या मुलींची कथा सांगतो. चित्रपट निर्माते म्हणतात की हा चित्रपट भारतीय कायदेशीर व्यवस्थेशी संबंधित खऱ्या घटनांवर आधारित आहे. ‘द केरळ स्टोरी २’ २७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Prakash raj takes dig at kerala story 2 show plate of beef pork dishes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • the kerala story

संबंधित बातम्या

Marathi Cinema: बॉलीवूडला सोडून मराठीत पदार्पण! अभिषेक कंवरचा ‘जनक’ 19 दिवसांत पूर्ण
1

Marathi Cinema: बॉलीवूडला सोडून मराठीत पदार्पण! अभिषेक कंवरचा ‘जनक’ 19 दिवसांत पूर्ण

‘उगाच खर्च नको, चित्रपट अधिक चांगला व्हायला हवा’, अल्लू अर्जुनच्या साध्या स्वभावाने जिंकली मनं!
2

‘उगाच खर्च नको, चित्रपट अधिक चांगला व्हायला हवा’, अल्लू अर्जुनच्या साध्या स्वभावाने जिंकली मनं!

Peddi Song Release: राम चरण, जान्हवी कपूर अन् श्रुती हासनचा भन्नाट डान्स! ‘पेद्दी’ चित्रपटातील ‘हेल्लाल्लालो’ गाणं आऊट
3

Peddi Song Release: राम चरण, जान्हवी कपूर अन् श्रुती हासनचा भन्नाट डान्स! ‘पेद्दी’ चित्रपटातील ‘हेल्लाल्लालो’ गाणं आऊट

Sonam Kapoor London Property: सोनम कपूरने लंडनमध्ये खरेदी केले ५ फ्लॅट्स; पण शेजाऱ्यांसोबत का सुरू झालाय मोठा वाद?
4

Sonam Kapoor London Property: सोनम कपूरने लंडनमध्ये खरेदी केले ५ फ्लॅट्स; पण शेजाऱ्यांसोबत का सुरू झालाय मोठा वाद?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.