(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडचे प्रसिद्ध कपल कतरिना कैफ व विकी कौशल यांनी अलीकडेच ते लवकरच आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली.गेल्या महिन्यात कतरिनाने तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करत विक्कीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या क्षणापासूनच चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे आणि सगळे त्यांच्या घरी लवकरच ऐकू येणाऱ्या बाळाच्या किलकिलाटाची वाट पाहत आहेत.
विकी कौशलने व्यक्त केली वडील होण्याची उत्सुकता
विकी कौशल नुकताच मुंबईमध्ये झालेल्या एका युवा कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाला होता. कार्यक्रमात निखिल तनेजा यांच्यासोबत संवाद साधताना त्याने वडील होण्याच्या भावना मोकळेपणाने शेअर केल्या आहेत.विक्की कौशलने नुकतेच वडील होण्याची भावना व्यक्त करताना त्याच्या आयुष्यातील या नव्या पर्वाबाबत खूपच आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला, “फक्त बाबा होणं हीच. खरंच मी खूप उत्सुकतेनं वाट पाहत आहे. मला वाटतं हा खूप मोठा आशीर्वाद आहे. लवकरच हे होणार आहे. त्यामुळे सकारात्मक विचार करतोय. मला तर असं वाटतंय की, मी घराबाहेर जाणारच नाही.” विकीनं यावेळी इंडस्ट्रीत त्याला १० वर्षं पूर्ण झाल्याबद्दही सांगितलं आहे. विकी म्हणाला, “मी देवाकडे प्रार्थना करतो की, ही फक्त सुरुवात आहे आणि मला अजून खूप काही करायचं आहे. खूप शिकायचं आहे, प्रगती करायची आहे. सगळीकडे आनंद पसरवायचा आहे.”
प्रिया बेर्डेचे दहा वर्षांनंतर पुनरागमन, स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’मध्ये साकारणार जबरदस्त भूमिका
नुकत्याच एका युवा कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात त्याने प्रेक्षकांशी संवाद साधताना अनेक खास गोष्टी शेअर केल्या. या मुलाखतीदरम्यान विकीच्या काही चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारले, ज्याला त्यानेही मनमोकळ्या शैलीत उत्तरे दिली.एका चाहतीनं त्याला आजवर विविध भूमिकांतून पाहिलं आहे; पण त्यानं साकारलेली अशी कोणती भूमिका आहे, जी त्याला त्याच्यासारखी वाटतं, असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “सॅम बहादूर. ते खूप उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व होतं. त्यांची शिस्तप्रियता, त्यांची मूल्यं सगळंच खूप छान होतं. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. विकीला त्यानंतर ज्या नवीन मुलांना या इंडस्ट्रीत यायचं आहे, त्यांना तू काय सल्ला देशील, असं विचारल्यानंतर विकी म्हणाला, “फक्त नशिबावर विश्वास ठेवून येऊ नका. तयारीसुद्धा करून या.”
सोशल मीडियावर दिली प्रेग्नंसीची खुशखबर
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक ब्लॅक अँड व्हाईट पोलरॉइड फोटो शेअर करत बाळाच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली होती. चाहत्यांनी या फोटोवर भरभरून प्रेम व्यक्त केलं होतं.
२०२१ मध्ये बांधली लग्नगाठ
या जोडीने डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानमध्ये आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत एक शाही विवाहसोहळा पार पाडला होता. तेव्हापासून ही जोडी बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रेमळ जोडप्यांपैकी एक ठरली आहे.आणि आता ही जोडी लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यामुळे विकी कतरिनासह त्यांच्या चाहत्यांमध्येही खूप उत्सुकता असल्याचं पाहायला मिळतं.