
फोटो सौजन्य - Social Media
नक्की काय आहे मुद्दा?
पलाशने काही वर्षांपूर्वी फिल्म निर्माता विज्ञान प्रकाश मानेकडून 25 लाखांची मागणी केली होती. तसेच ते पैसे 6 महिन्यात परत करेल असा विश्वासही पलाशने दिला होता. मुळात, पलाशने हे पैसे एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी घेतले होते. 6 महिने उलटले, पाहता-पाहता वर्षे दीड-दोन वर्षे उलटली परंतु त्याच्या नव्या निव्वळ शुभारंभही झाला नाही. हे पाहता, जेव्हा विज्ञान प्रकाश माने त्याचे पैसे परत मागण्यासाठी पलाशकडे गेला, तेव्हा पलाशने उडवाउडवीची उत्तरे देत त्याला जातीवरून अपशब्द वापरले. विज्ञान प्रकाश माने यांनी सरळ पोलीस स्टेशनाची धाव घेतली. सांगली पोलिसांनी एट्रोसिटी ऍक्टअनुसार त्याची तक्रार नोंदवली आहे.
काय म्हणाला फिल्म निर्माता विज्ञान प्रकाश माने?
सूत्रांना प्रतिक्रिया देताना विज्ञान प्रकाश माने म्हणाला की, “मी भारतीय संविधानाला मानणारा माणूस आहे. पलाशने मला विश्वासात घेऊन 25 लाख घेतले. म्हणाला चित्रपट निर्मितीसाठी घेतोय 6 महिन्यात परत करीन. वर्षे उलटली तरी पठ्ठयाने पैसे काही परत केले नाही. मागितले तर उडवाउडवीची उत्तरे देत, प्रत्येकवेळी उद्या परत करेल असेच म्हणतो. भेटायला गेलो तर एका विशिष्ट जातीवरून त्याने मला अपशब्द वापरले. जे शब्द मी आता वापरूही नाही शकत.”
आधीही अडकला होता वादात!
पलाश मुच्छल काही महिन्यांपूर्वी त्याच्या लग्नासंबंधित वादात अडकला होता. क्रिकेटपटू स्मृती मंधानासह त्याचा विवाहसोहळा सांगली येथे आयोजित करण्यात आला होता. परंतु, त्याने स्मृतीला Cheat केल्याचे प्रकरण समोर आले आणि भरलेला मांडव निकामा झाला.