(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
सुनील शेट्टी त्याच्या ताज्या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही काळापूर्वी, अभिनेत्याने त्याची मुलगी अथिया शेट्टीच्या प्रसूतीबद्दल वादग्रस्त विधान केले होते, त्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्यावर जोरदार टीका झाली होती. गौहर खान सारख्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वानेही पुढे येऊन सुनील शेट्टीचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आणि आता पुन्हा एकदा तो महिलांबद्दलच्या त्याच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे.
लवकरच ‘हेरा फेरी ३’ मध्ये दिसणारा सुनील शेट्टीने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की महिलांनी मुलांची काळजी घ्यावी तर पुरुषांनी बाहेर जाऊन त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे. अभिनेत्याची ही मुलाखत बाहेर येताच सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होऊ लागली आणि लोकांनी त्याला जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली. खरंतर, अभिनेता त्याच्या मुलाखतीत कुटुंब आणि लग्नाबद्दल संवाद साधताना दिसला आहे. आता अभिनेता नक्की या नात्याबद्दल काय म्हणाला जाणून घेऊयात.
बाबा झाल्यानंतर सिद्धार्थने घेतले बाप्पाचे दर्शन, सिद्धिविनायक मंदिरात लावली आईसोबत हजेरी
सुनील शेट्टीने दिला लग्नाबद्दल गुरुमंत्र
बॉलीवूड अभिनेते सुनील शेट्टी या मुलाखतीत म्हणाले की, ‘लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ लागतो. पण आजच्या मुलांमध्ये लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ देण्याइतका वेळच राहिला नाही आहे, म्हणूनच इतके घटस्फोट होत आहेत.’ तसेच, अभिनेता पुढे म्हणाला, ‘आजच्या मुलांमध्ये तेवढा संयम पण राहिलेला नाही आहे. लग्न काही काळानंतर एक तडजोड बनते. जिथे तुम्हाला एकमेकांना समजून घ्यावे लागते. तुम्हाला एकमेकांसाठी जगावे लागते.’ असे अभिनेता म्हणताना दिसला आहे.
अभिनेता पुढे म्हणाला, ‘नंतर एक मुलं जन्माला येते तेव्हा एका पत्नीला माहित असणे गरजेचे आहे की नवरा स्वतःचे करिअर बनवेल आणि मी मुलाची काळजी घेईल. नवरा देखील आपल्याला मदत करेल. पण आजकाल प्रत्येक गोष्टीचा खूप दबाव मनावर पडला जात आहे.’ असे सुनील शेट्टी म्हणाले आहेत. परंतु, अभिनेत्याचे हे विधान मीडिया वापरकर्त्यांना आवडले नाहीत. लोकांनी त्यांना खूप ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
आयपीएस अधिकाऱ्यांची टीम पोहचली आमिर खानच्या घरी? अभिनेत्याने स्वतःच सांगितले कारण, म्हणाला…
सोशल मीडियावर अभिनेता ट्रोल
‘हेरा फेरी ३’ चा अभिनेता सुनील शेट्टीला ट्रोल करताना, लोकांनी कमेंट केली आहे की तो अभिनेता ६० वर्षांचा आहे आणि त्यांची विचारसरणी देखील ६० पेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, एका वापरकर्त्याने लिहिले, ‘पीआरने तुम्हाला सांगितले नाही का?’ इतर वापरकर्त्यांनी ट्रोल करताना लिहिले, ‘हा माणूस स्वतःची प्रतिमा खराब करत आहे.’ असे लिहून लोक अभिनेत्यावर टीका करताना दिसले आहेत.