(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी एका मुलीचे पालक झाले आहेत. अभिनेत्यांनी सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी शेअर केली. ही बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांचा चांगलाच आनंद झाला. पोस्टवर चाहत्यांसह अनेक मोठमोठ्या कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले. वडील झाल्यानंतर पहिल्यांदाच, अभिनेत्याने त्याच्या आईसोबत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भेट दिली. आणि अभिनेत्याचे बाप्पाचे आशीर्वाद घेतल्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एल्विश यादव आणि करण कुंद्रा ठरले ‘Laughter Chefs 2’ विजेते; स्कोअरबोर्डवर मिळवले एवढे स्टार?
अभिनेता त्याच्या आईसोबत दर्शनासाठी पोहोचला
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या आईसोबत रविवारी, २७ जुलै रोजी मुंबईतील सिद्धिविनायक गणेश मंदिरात पोहोचला, ज्याचे फोटो सोशल मीडियावरही आले आहेत. फोटोंमध्ये अभिनेता पँट-शर्ट आणि गळ्यात लाल रंगाचा स्कार्फ घालून हात जोडून उभा असल्याचे दिसून आले. त्याची आई देखील भक्तीत मग्न असल्याचे दिसून आले. अभिनेता त्याच्या नवजात मुलीसाठी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहचला होता. बाबा झाल्यांनतर सिद्धार्थ पहिल्यांदाच मीडिया समोर आला.
Our Heart-throb @SidMalhotra visited Siddhivinayak Temple with his mother Rimma Malhotra to offered prayers and seek blessings from Bappa for his newborn baby Malhotra and family! 🙏😇❤️🧿
Ganpati Bappa Morya 🙏✨ @SVTMumbai#SidharthMalhotra #BabyMalhotra pic.twitter.com/GVRs9hhFbP
— Sidharth Malhotra FC (@SidharthFC_) July 28, 2025
सोशल मीडियावर वडील होण्याचा आनंद केला शेअर
१६ जुलै रोजी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी एका मुलीचे पालक झाले. अभिनेत्याने इन्स्टाग्रामद्वारे ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली. यासोबतच, अभिनेत्याने संदेशात म्हटले आहे की त्याचे हृदय आनंदाने भरले आहे आणि त्याचे जग बदलले आहे. यासोबतच त्याने सांगितले की त्यांना मुलगी झाल्याचा आशीर्वाद मिळाला आहेत.
Saiyaara ने रचला इतिहास, ‘या’ चित्रपटाला मागे टाकून २०२५ चा सर्वाधिक कमाई करणारा ठरला ३ चित्रपट
सिद्धार्थ मल्होत्राचे आगामी चित्रपट
सिद्धार्थ मल्होत्राच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता लवकरच दिनेश विजनच्या ‘परम सुंदरी’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याशिवाय तो ‘वन-फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ चित्रपटातही दिसणार आहे. अभिनेता शेवटचा ‘शेरशाह’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.