अनेकदा वादात राहणारे बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा त्यांच्या अश्लील कमेंट्समुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा बळी ठरले आहेत. यावेळी त्यांच्या टीकेचे कारण ‘वॉर २’ चित्रपटाच्या टीझरमधील अभिनेत्री कियारा अडवाणीचा बिकिनी लुकवर कंमेंट करणे ठरले आहे, ज्यावर भाष्य करणे राम गोपाल वर्मा यांना महागात पडले आहे. तसेच आता याचीच चर्चा सर्वत्र होत आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करून ही पोस्ट डिलीट केली आहे. दिग्दर्शक नक्की काय म्हणाले आणि अडचणीत अडकले आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
आक्षेपार्ह टिप्पणी केली डिलीट
‘वॉर २’ च्या टीझरमध्ये, कियारा अडवाणी पूलसाईडच्या एका दृश्यात बिकिनीमध्ये दिसली होती. या दृश्याचा स्क्रीनशॉट घेत राम गोपाल वर्माने सोशल मीडियावर एक अश्लील टिप्पणी केली. या पोस्टसाठी सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्यावर बरीच टीका केली. परिस्थिती अशी होती की चाहत्यांच्या टीकेमुळे दिग्दर्शकाला त्यांची पोस्ट डिलीट करावी लागली.
‘राजा शिवाजी’च्या रूपात चमकला रितेश देशमुख, फर्स्ट लुकने वेधले लक्ष; चित्रपट कधी होणार रिलीज!
लोकांनी दिग्दर्शकाला केले ट्रोल
राम गोपाल वर्माच्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेक वापरकर्त्यांनी त्यांच्यावर टीका केली आणि थेट त्याच्या वयाचा आदर करण्यास सांगितले. त्याच वेळी, काहींनी त्याच्या मानसिक स्थितीवर थेट प्रश्न उपस्थित केले. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘कल्पना करा की जो माणूस या गोष्टी सार्वजनिकरित्या लिहू शकतो तो त्याच्या खाजगी आयुष्यात काय विचार करत असेल.’ मात्र, पोस्ट डिलीट केल्यानंतरही प्रकरण शांत होताना दिसत नाही आहे.
कियाराच्या चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला
या संपूर्ण प्रकरणात कियारा अडवाणीचे चाहते एकत्र आले आणि त्यांनी राम गोपाल वर्मा यांना ट्रोल केले. सोशल मीडियावर कियारा अडवाणी ट्रेंड करू लागली आणि वापरकर्त्यांनी अशी मागणी केली की सेलिब्रिटींनी महिलांबद्दल अशी भाषा टाळावी. तसेच आता अभिनेत्रीचे चाहते तिला पाठिंबा देताना दिसले आहे.
पवनदीप राजनच्या प्रकृतीत सुधारणा; आई आणि मुलाचे एकमेकांवरील प्रेम पाहून चाहते भावुक, पाहा PHOTOS
‘वॉर २’ मधील कियाराची दमदार भूमिका
दरम्यान, कियारा अडवाणीच्या ‘वॉर २’ चित्रपटाच्या टीझरला खूप प्रशंसा मिळत आहे. या चित्रपटात हृतिक रोशन मुख्य भूमिकेत आहे आणि ज्युनियर एनटीआर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करत आहे आणि १४ ऑगस्ट २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर लाँच झाला आणि या टीझरला २४ तासांत २ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.